News: राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर १६ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन स्वरुपात करता येईल. ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये डॅशबोर्डवर व पालकांसाठी https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर अंतरिम उत्तरसूची (Interim Answer key) या शीर्षकाखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विहित मुदतीनंतर त्रुटी आक्षेपबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी, आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.



