News: निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांना मणिपूर येथील बिर टिकेंद्रजित विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे येथील एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त) यांना इंफाळ, मणिपूर येथील बिर टिकेंद्रजित विद्यापीठाने प्रतिष्ठेची व सन्मानाची अशी समजली जाणारी मानद डॉक्टरेट (तत्वज्ञान) Honarary Doctor Of Philosophy ही पदवी जाहीर केली आहे. एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त )यांच्या देशसेवेतील अपूर्व योगदानाच्या कार्याचा हा बहुमान आहे.
एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त) ह्यांना परम विशिष्ट सेवा मेडल ने राष्ट्रपती यांच्या हस्ते यापूर्वी गौरविण्यात आले असून ते अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष आहेत. प्रदीप बापट यांना मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेश अलंकार रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.प्रदीप बापट हे आंतरराष्ट्रीय सायकल पोलो खेळाडू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे.

अखिल “भारतीय सायकल पोलो” संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. “स्वरूप वर्धिनी” चे प्रदीप बापट संचालक पण आहेत. Federation of chakan,(pune) industries चे संचालक आहेत. अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिष्ठित पुरस्कारही यापूर्वी त्यांना प्राप्त झाले आहेत.
मणिपूर येथे होणाऱ्या पदवीदान समारंभामध्ये त्यांना “Honorary Doctor Of Philosophy” ही मानद पदवी मणिपूर राज्याचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांचे हस्ते विद्यापीठाच्या “महाराजा गंभीर सिंह मेमोरियल हॉल” मध्ये संपन्न होणाऱ्या भव्य पदवीदान कार्यक्रमात प्रदीप बापट यांना सन्मानपूर्वक पदवी प्रदान करण्यात येणार आहे.


