आपला जिल्हा

News: जेजुरी: देवमळा ग्रामपंचायतीची पहिलीच ग्रामसभा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळील नव्याने स्थापन झालेल्या देवमळा ग्रामपंचायतीची पहिली ऐतिहासिक ग्रामसभा उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेची सुरुवात संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली.

ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायत कार्यालयासाठी जागा निश्चित करणे, सर्व मिळकतींची नमुना क्रमांक ८ कर आकारणी रजिस्टरमध्ये नोंद करणे तसेच पती-पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणी करणे, गावातील दिव्यांगांची नोंदणी करणे याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रिया राबविणे, टंचाई आराखडा तयार करून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, ग्रामपंचायत हद्दीचे वाचन करून विकासकामांबाबत चर्चा करणे या विषयांवरही ग्रामस्थांनीमते मांडली.

याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करणे तसेच गावातील मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सभेचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिलांची स्वतंत्र सभा देखील पार पडली.

ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून प्रशासक सागर कांबळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी पुंडलिक म्हस्के यांनी कामकाज पाहिले. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ग्रामसभेला गावातील महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button