क्राईम

Crime News: जेजुरी : बेलसर येथील मशरूम कंपनीत पाण्याच्या टाकीत ड्रेनेज साफ करताना गुदमरून तीन जणांचा मृत्यू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत आज दि.26/04/2026 रोजी दु 04:30 वा. बेलसर ता. पुरंदर, जि. पुणे येथील वाडा ऍग्रो मशरूम कंपनी बेलसर येथील मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज साफ करताना टाकीत उष्णतेमुळे गॅस तयार होऊन गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेलसर येथील मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज साफ करण्यासाठी एक कर्मचारी टाकी साफ करण्यासाठी खाली उतरला असता तो वर येत नाही हे पाहता दुसरा कर्मचारी खाली उतरला त्यानंतर ते दोन्ही कर्मचारी वर येत नाही हे पाहून परत एक कर्मचारी खाली उतरला असता ते तिन्ही कर्मचारी वर येत नाही हे पाहून शेजारील काही इसमानी तत्काळ जीसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील स्लॅप फोडून त्यांना बाहेर काढले व सदर इसमांना जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. सदरील तीन इसम टाकीत आतमध्ये उष्णतेमुळे गॅस होऊन साठलेल्या गॅसमुळे बेशुद्ध पडून जागेच मयत झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. या तिन्ही इसमांचे पोस्टमार्टम चालू असून अकस्मात मयत दाखल करून पुढील तपास करत आहोत.

मयत व्यक्तीची नावे खालीलप्रमाणे
1) पिंटू राजेश प्रसाद (वय 23 वर्षे) रा.खोराराम, ता.जि.देविरया
2) व्यास सोहम कुमार (वय 22 वर्षे) रा. नवतम तालुका जिल्हा देवरिया राज्य उत्तर प्रदेश
3) गौतम रामसुरन कुशवाहा (वय 36 वर्षे) रा.मेदनापूर, तालुका रुद्रपुर जिल्हा देवराई, राज्य उत्तर प्रदेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button