News: केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत पात्र उमेदवारांनी नियुक्तीबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर २१ मार्च २०२६ पर्यंत भरण्यात यावी.

परीक्षेची गुणपडताळणी उपलब्ध करुन घेण्यासाठी https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx या लिंकवर ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. गुण पडताळणीसाठीचे प्रती पेपर ५०० रुपये शुल्क लिंकद्वारे भरण्यात यावेत. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर गुणपडताळणी उपलब्ध करुन देण्यात येईल.
परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तसेच गुणपडताळणी उपलब्ध करुन घेण्यासाठीची माहिती दिलेल्या लिंकमध्येच भरावी. ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.



