क्राईम

Crime News: गॅरेज चालक 01 किलोग्रॅम वजनाचा मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ जवळ बाळगले स्थितीत मिळून आला असून सुमारे 2,10,40,000/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भारत सरकारचे वतीने नशामुक्त भारत अभियानाची सुरूवात करणेत आलेली असून युद्धपातळीवर प्राधान्याने कारवाया करून भारत देश नशामुक्त करण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होवू नये या करीता पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, संदीप सिंह गिल्ल साहेब यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत नवीन वर्षाचे सुरूवातीस अवैध रित्या अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना केले होते.

दि. १७/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध व्यवसायांवर कारवाई करणेच्या अनुषंगाने गस्त करत असताना शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या देवाण-घेवाण होणार असून खात्रीशीर माहिती काढून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, यांनी पथकाला दिले होते. स्था.गु.शा.चे पथकाने गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त केली असता, शिरूर शहरातील गॅरेज चालक शादाब रियाज शेख, रा. डंबेनाला, शिरूर ता. शिरूर जि.पुणे हा त्याचे ताब्यातील हिरो होंडा पेंशन मोटार सायकल घेवून बाबुरावर नगर परिसरातील मोकळ्या मैदानात एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली, त्या माहितीचे अनुषंगाने पथकाने कायदेशीर तरतुदींची पुर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर यांचे आदेश प्राप्त केले. छापा कारवाईचे सर्व साहीत्य व पंचांसह स्था.गु.शा. व शिरूर पो स्टे चे पथक संयुक्त कारवाई साठी रवाना झाले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी दि. १८/०१/२०२६ रोजी रात्री १२/१० वा. सु ास पथकाने जावून छापा कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपी शादाब रियाज शेख, (वय ४१ वर्षे) व्यवसाय गॅरेज चालक, रा. डंबेनाला, शिरूर ता. शिरूर जि. पुणे यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे ताब्यात १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ व मोटार सायकल असा एकूण २,१०,७०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल मिळून आला आहे.

सदर कारवाई मध्ये इसम नामे शादाब रियाज शेख, (वय ४१ वर्षे) व्यवसाय गॅरेज चालक, रा. डंबेनाला, शिरूर ता. शिरूर जि.पुणे याचेवर सरकारतर्फे फिर्यादी होवून स.पो.नि. कुलदीप संकपाळ नेमणूक स्था.गु.शा.पुणे ग्रामीण यांनी शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ क, २१ क प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि. संदेश केंजळे, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि दत्ताजीराव मोहिते, शिक्रापूर पो स्टे चे श्रेणी पोसई पंडीत मांजरे, पोलीस मुख्यालयाचे पोकॉ पोपट गायकवाड, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, निलेश शिंदे, राहुल पवार, योगेश नागरगोजे, समाधान नाईकनवरे, भाउसाहेब पुंड, सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, अंबादास थोरे, सचिन भोई, यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई शुभम चव्हाण, शिरूर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button