Crime News: जेजुरी : वाल्हे येथे अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून 1,00,000/- रु. किंमतीचे सोने चांदीचे दागिने केले लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून घेऊन गेले असून याबाबत यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी मंगेश रमेश पवार (वय 30 वर्षे) व्यवसाय- बांधकाम, रा.पवारआळी वाल्हा, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी अज्ञात चोरटा याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केला आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. 03/02/2024 रोजी राञी 11/00 वा. दि. 04/02/2024 रोजी पहाटे 03/00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे राहते घरात खिडकीतुन कशाचेतरी साहयाने घराचा पुढील दरवाजा उघडुन घरात आत प्रवेश करुन माझे घरातील बेडरुम मधील लोखंडी कपाटातील गेला माल- 1) 65000/- एक 1 तोळयाचे सोन्याची गंठन साखळी, 3 ग्रॅम वजनाचेगंठण वाटया 4 मणी, सोन्याची तार, 1 तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, 4 बदाम सोन्याचे 3 ग्रॅम वजनाचे, सोन्याची साखळी 2 ग्रॅम, कर्णगुंड चमकी अंगठी 3 ग्रॅम, 3 लहान मुलाचे सोन्याचे अंगठया एकुण वजन 1 ग्रॅम, डुल दोन सोन्याची कानातील 1 ग्रॅम, चांदीच्या 4 जोडवी जोड, ब्रोसलेट चांदीचे, पैजण चांदीचे 4 नग, घुंगराचे वाळे 4 नग, चांदीचे फुलपाञ, चांदीचा चमचा, चांदीचा ग्लास, जु.वा.किं.अं.
2) 20,000/- रुपये रोख रक्कम 20 रुपये असलेले 3 नोटांचे बंडल ते 6000/- रुपये व इतर 100, 50, 200, 500 च्या नोटा असे 14000/- हजार रुपये असे एकुण 20000/- हजार रुपये
3) 15,000/- रुपये किंमतीची मोटार सायकल आमचेच गावातील आमचे मिञ सुनिल दत्ताञय भोसले रा वाल्हा ता पुरंदर जि पुणे यांची टु व्हीलर हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडीनं एम एच 12 के.एम 5425 ही गाडी वर्णन गाडीच्या पुढील बाजुस दादाची पुण्याई, सुजल व सवाई सर्जाचं चांगभंल असे लिहलेले ही त्यांचे राहते घराचे पाठी मागुन चोरी करुन घेवुन गेले आहेत. असा एकूण 1,00,000/- (1 लाख रुपये) वरील वर्णना चे दागिने व रोख रक्कम घरफोडी करुन चोरुन नेले आहेत. यावरुन जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 39/2023 भा.द.वी क – 379, 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई पाटील हे करत आहेत.



