क्राईम

Crime News: शिर नसलेला मृतदेहाची 12 तासांचे आत ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे दि. २६/०४/२०२५ रोजी दाखल असून दि. २५/०४/२०२५ रोजी भोर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शिरगाव येथील जननी माता मंदीरापासून जाणाऱ्या रस्त्यालगत माळरानावर पुरुष जातीचा वय अंदाजे ३५-४० वर्षे, शिर नसलेला मृतदेह मिळून आला होता. सदरचा मृतदेह एका जनावरे चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने पाहिलेनंतर त्याने सदरची बाब पोलीस पाटील यांना सांगितली. पोलीस पाटील व भोर पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी घटनास्थळी भेट दिली असता, सदर मृतदेहाबाबत खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे (वय ५२ वर्षे) रा. वारखंड ता. भोर, जि. पुणे यांचे फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद नोंदवून वरील प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सदरचा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना केले. पथकास तपासाचे अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर नेम. स्थागुशा यांचे अधिनस्त सदर गुन्हयाचा समांतर तपास करत होते. सदर गुन्हयातील मृतदेहाची ओळख पटविणे आवश्यक होते, गांभीर्यपूर्वक तपास करत असताना पथकातील पोहवा अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर रा. वडगाव बु॥ ता. हवेली, जि. पुणे हा दोन दिवसांपासून बेपत्ता असून त्याचा नातेवाईक नामे संतोष भिकु पिसाळ रा. वडगाव बु।। पुणे यांचेत दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते आणि त्यांचा जुन्या वादावरून एकमेकांवर राग आहे. अशी माहिती मिळाल्याने मृतदेहाची ओळख पटवित असताना सदरचा मृतदेह हा संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (वय ४० वर्षे) रा. सोनल हाईटस वी विंग फलॅट नं. ४रा. वडगाव बु॥ ता. हवेली, जि. पुणे याचा असल्याचे त्याचे नातेवाईकांकडून निष्पन्न झाले. त्यानंतर स्थागुशाचे पथकाने संशयित आरोपी संतोष भिकू पिसाळ यास चौकशीकामी ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने व त्याचे साथीदाराने मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले, सदर गुन्हयाचे कामी आरोपी नामे १) संतोष भिकु पिसाळ (वय ४२) वर्षे सध्या रा. साई प्लॅनेट बिल्डींग फ्लॅट नं. २०४ वडगाव बु । ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. रांजे ता. भोर जि. पुणे २) अनिकेत चंद्रकांत पिसाळ (वय २९ वर्षे) सध्या रा. अनंत सृष्टी फलॅट न.४०३ आबेगाव खुर्द ता. हवेली जि.पुणे यांना दि. २६/०२/२०२४ रोजी ताब्यात घेवून पुढील तपास कामी भोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपींना न्यायालयात हजर करणेत आले असून न्यायालयाने त्यांची दि. ०४/०५/२०२४ रोजी न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केली असून पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पो नि आण्णा पवार हे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. तानाजी बरडे भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पो स्टे चे पो नि आण्णा पवार, स्थागुशा चे सपोनि दत्ताजीराव मोहिते, सफौ हनुमंत पासलकर, पोहवा अमोल शेडगे, पोहवा बाळासाहेब खडके, पोकों मंगेश भगत, पोकों धीरज जाधव, भोर पो स्टे चे अंमलदार धर्मवीर खांडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button