News: पूर्व सैनिक हे समाजाला दिशा देणारे महान कार्यवाहक : एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. 04/05/2025 अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताची कार्यकारिणी बैठक जेजुरी येथे संपन्न झाली. सेवारत सैनिक तसेच सेवा निवृत्त झालेले सैनिक यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना येणार्या वेगवेगळ्या अडीअडचणी विषयी चर्चा व त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.

AVM वैद्य सर मार्गदर्शन करताना म्हणाले अत्यंत शिस्तबद्ध व सर्वच प्रकारचे प्रशिक्षित भारतीय सेना दलातील सैनिक हे देशाचे भूषण आहेत. ते निवृत्त झाले तरी समाजातील कोणत्याही कामासाठी तत्परतेने तयार असतात. त्यांच्या अनुभवाचा देशाला मोठा उपयोग होईल. ते समाजाचे महान कार्यवाहक आहेत तसेच या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सैनिक भरती मार्गदर्शन तसेच NDA/IMA व UPSC साठी मार्गदर्शन करता येईल असे सूचित त्यांनी केले.

या वेळी कर्नल गोयल, कर्नल हेमंत जोशी यांनी सेवानिवृत्त सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी, जेसीओ मटकर, अविनाश वझल, दिलीप दीक्षित, सागर पाटील, परमेश्वर मटकर, राजू देवकर, रविकांत उपाध्ये, शीतल उपाध्ये, तसेच संघटक रमेश देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल चे प्राचार्य बाळासाहेब झगडे यांनी केले.