Crime News: पुणे ग्रामीण जिल्हयामधील बँकेवर दरोडा घालणाऱ्या सतीश आप्पासाहेब इथापे याचे टोळीला मोक्का अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये यवत पोलीस स्टेशन हददीत दिनांक १०/०९/२०१६ रोजी राहु ता. दौंड, जि.पुणे या गावामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राहु ता. दौड जि.पुणे येथे सशस्त्र दरोडा पाडुन बॅकेतुन ६५ लाख रूपये रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरून घेवुन गेले होते. त्याबाबत यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ६२२/२०१६ भादवि क ३९५ प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.
दाखल गुन्हयाचा तपास तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव, व त्यांचे तत्कालीन सहकारी अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच यवत पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक विलास नाळे, पो. हवा महेश बनकर, तसेच यवत पोलीस ठाणेचे पोलीस पथक यांनी समांतरपणे करून गुन्हयाचे तपासामध्ये गोपनीय बातमीदारांमार्फत व तांत्रिक विश्लेषण याचा वापर करून गुन्हयाचे तपासामध्ये १) सचिन आप्पा ऊर्फ आप्पासाहेब ऊर्फ भाऊसाहेब इथापे, (बनावट नाव ) शिवाजी आप्पा पाटील (वय.२८ वर्षे) रा. सध्या रा.प्लॉट नं ३५ माधवनगर धुळे रोड चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव मुळ रा. कोंडेगव्हाण ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर २) रामदास ऊर्फ पप्पु ऊर्फ झिंग्या ऊर्फ समीर यशवंत ढगे (वय २७ वर्षे) रा.चांबुर्डी ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ३) पृथ्वीराज ऊर्फ पतंग दत्तात्रय माने (वय.२७ वर्षे) रा. मानेवस्ती कन्हेरगाव ता. माढा, जि. सोलापुर ४) मारूती उर्फ पिंट्या शिवाजी सरडे (वय २३ वर्षे) रा. कन्हेरगाव ता. माढा जि. सोलापूर ५) सतिश आप्पा इथापे, उर्फ सतीश आप्पा पाटील (वय ३० वर्षे), रा. प्लॉ नं.३५, माधवनगर पुर्वा पेट्रोलपंपाचे मागे, धुळेरोड चाळीसगाव, जि. जळगांव ६) मंगल आप्पा इथापे, (वय ४६ वर्षे) रा. प्लॉट नं. ३५, माधवनगर पुर्वा पेट्रोलपंपाचे मागे, धुळेरोड चाळीसगाव, जि. जळगांव ७) प्रियंका ज्ञानेश्वर उर्फ माउली लोकरे, उर्फ प्रियंका दिपक देशमुख, (वय २४ वर्षे) रा. प्लॉट नं.३५, माधवनगर पुर्वा पेट्रोलपंपाचे मागे, धुळेरोड चाळीसगाव, जि. जळगांव ८) तुषार शिवाजी सरडे रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर ९) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगन्नाथ लोकरे (बनावट नावः दिपक दादासो देशमुख) हल्ली रा. प्लॉट नं ३५ माधवनगर धुळे रोड चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव मुळ रा. शिराळा टेंभुर्णी ता. माढा, जि. सोलापुर १०) बबलु ऊर्फ बिसेट साळवे रा. विखेपाटील कॉलेज शेजारी एम.आय.डि.सी अहमदनगर या एकुण १० आरोपीं निष्पन्न केलेले होते.

तत्कालीन प्राथमिक तपास अधिकारी यांनी आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलमांप्रमाणे प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक यांचे मार्फतीने विश्वास नांगरे पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना पाठविला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलमांतर्गत प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग दौंड राजेंद्र मोरे (सेवानिवृत), तत्कालीन सहा पो निरीक्षक विलास नाळे, पो हवा महेश बनकर यांचे तपास पथकाने करून आरोपींविरूध्द मा. विशेष न्यायालय मोक्का कायदयांतर्गत शिवाजीनगर पुणे यांचे न्यायालयात सन २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
दिनांक 13/09/2024 रोझी मा. विशेष न्यायालय, मोक्का कायदयांतर्गत शिवाजीनगर पुणे यांनी आरोपीं अ.नं १ ते ४ यांना भारतीय दंड विधान व मोक्का कायदयांतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० लाख रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी व आरोपी अ.नं ५ ते ७ यांना भा.द.वि.क ४१२, ४१३, ४१४ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलमांप्रमाणे ७ वर्ष सक्त मजुरी व दहा लाख रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे न्यायालयीन कामकाज सरकारी वकील चंद्रकिरण साळवी, कोर्ट पैरवी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विधाधर निचीत यांनी पाहिलेले आहे. पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांनी संपुर्ण तपास पथकाचे व न्यायालयीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केलेले आहे.



