Crime News: प्रवासाचे बहाण्याने इरटीगा कारमध्ये बसून कार चालकास मारहाण करत त्यांचा खून करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं. २४/२०२५ भा.न्या.सं. १०३(१),३०९ (६),२३८,६९(२) ३(५) प्रमाणे दि. २८/०१/२०२५ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे अंकुश राजेश गायकवाड, (वय ३० वर्षे), रा. निधी अपार्टमेंट जेलरोड, नाशिक, ता. जि. नाशिक यांचे वडील नामे राजेश बाबुराव गायकवाड, (वय ५६ वर्षे) व्यवसाय चालक रा. सदर हे दि. २७/०१/२०२५ रोजी नाशिक येथून त्यांचे ताब्यातील इरटीगा कार नं. एम.एच. १५ जे.डी. ५१९३ ही घेवून पुणे येथे गेले होते. रात्रौ १०/३० वा सुहास राजेश गायकवाड यांचे फोनवरून फिर्यादीचे आईचे फोन वर फोन आला व राजेश गायकवाड यांचा फोन पुणे-नाशिक हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाला असून फोन समाधान हॉटेल येथे आहे. या माहितीचे आधारे फिर्यादी व कुटुंबीय हे आळेफाटा येथे आले त्यांनी राजेश गायकवाड यांचा शोध घेतला, ते मिळून न आल्याने दि.२८/०१/२०२५ रोजी मानव मिसींग रजि.नं. ०४/२०२५ प्रमाणे खबर नोंदविणेत आली. त्यानंतर स. ०९/३० वा दरम्यान संतवाडी परिसरात राजेश बाबुराव गायकवाड, (वय ५६ वर्षे) व्यवसाय चालक रा. सदर यांचा मृतदेह मिळून आला, त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते. सदर परिस्थीतीवरून वरील प्रमाणे अनोळखी व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंदविणेत आला.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा.चे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकास सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, आसपासचे परिसरात साक्षीदारांकडे तपास करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे स्था.गु.शा.चे पथकाने आळेफाटा पो स्टे चे तपास पथकाचे मदतीने तपास सुरू करून मृतदेह मिळून आलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, नाशिक ते पुणे लेनलगतचे हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मयत राजेश गायकवाड यांचेकडील इरटीगा कार ही विरूद्ध दिशेने येवून मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणी गेली व पुन्हा मागे आळेफाटा बाजूकडे जावून माळशेज घाटाकडे गेली होती. तपासा दरम्यान राजेश गायकवाड यांची इरटीगा कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिक कडे जाताना कार मध्ये त्यांचेव्यतिरीक्त आणखी दोन इसम बसलेले होते व एका व्यक्तीचे डोक्यात पांढरे रंगाची कॅप होती. त्याद्वारे चाकण चौकातील नाशिककडे जाणारे गाडीतळावर जावून चौकशी केली असता, पांढरे रंगाची कॅप घातलेल्या इसमा सोबत इतर तीन व्यक्ती असल्याचे आढळून आले.
दरम्यान इरटीगा कार ही कसारा घाटात मिळून आल्याने सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातीलच असावेत असा संशय बळावल्याने पथकाने त्या परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळविली असता, सदर गुन्हयातील फुटेज मधील व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे, रा. सातपूर जि. नाशिक व विशाल आनंदा चव्हाण रा. गंगापूर-कॉलेज रोड नाशिक हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असलेबाबत माहिती मिळाली. माहितीचे आधारे संशयितांचा शोध घेतला असता, सदरचे आरोपी पुन्हा गुन्हा करणेसाठी कल्याण बाजूकडून ओतूर बाजुकडे येत असलेबाबत माहिती मिळाल्याने माळशेज घाटाजवळ सापळा लावून दि. ३१/०१/२०२५ रोजी आरोपी १) विशाल आनंदा चव्हाण (वय २२ वर्षे), रा. गंगापूर रोड, बिगबाजार बैंकसाईट, महेश अपार्टमेंट कॉलेज रोड, नाशिक, २) मयुर विजया सोळसे, (वय २३ वर्षे), गंगापूर रोड, गोकुळवाडी श्रीरंगनगर, नाशिक, ३) ऋतुराज विजय सोनवणे, (वय २१ वर्षे), रा. गंगापूर रोड विदद्या विकास सर्कल, गोकुळवाडी, नाशिक अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी नाशिक जाण्यासाटी प्रवास म्हणून कार मध्ये बसले आणि आळेफाटयाजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह टाकून देवून कार घेवनू निघून गेले असल्याचे सांगितले.

आरोपींना विश्वासात घेवून चौकशी करता यातील मुख्य आरोपी नामे युवराज मोहन शिंदे याने यापुर्वी त्याचे इतर साथीदारांचे मदतीने अशा प्रकारे गुन्हे पद्धतीचा अवलंब करून एक इरटीगा कार जबरदस्तीने चोरून नेली असून त्याबाबत चाकण पोस्टे गुर.नं. ७२९/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६) ३(५), आर्म अॅक्ट ४,२५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदरचे आरोपी हे सराईत असून आरोपी विशाल चव्हाण व मयुर सोळसे यांचेवर गंगापूर (नाशिक) पो स्टे गुरनं ३७/२०८ भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद असून आरोपी युवराज मोहन शिंदे याचेवर मालमत्ता चोरी व शरिराविरूद्धचे चार गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता, दि. ०७/०२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली अस पुढील तपास आळेफाटा पो स्टे व स्था.गु.शा. हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोप पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोल् निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोस्टे चे पो नि दिनेश तायडे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोसई अमित सिदपाल आळेफाटा पो स्टे चे सपोनि अमोल पन्हाळकर, पोसई चंद्रशेखर डुंबरे, स्था.गु.शा.चे अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीण, संदिप अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, आळेफाटा पोस्टेचे अंमलदार विनोद गायकवाड, अमित माळुंजे, सचिन कोबल, ग जगताप, ओंकार खुणे, यांनी केली आहे.