Crime News: जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलीसांची कारवाई; सुमारे 3,97,000/- किंमताचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरे खु।। गावचे हद्दीत निरा डावा कॅनालचे कडेला झाडा झुडुपाच्या आडोशाला गावठी दारूची हातभट्टी मिळून आली असून याबाबत फिर्यादी सौरभ योगीराज माने (वय 28 वर्षे) पो.काँ ब.न. 1241 नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी आरोपी परशुराम सुनिल बरकडे रा. पिंपरे खु।। ता. पुरंदर जि.पुणे याच्या विरोधात जेजुरी स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 01/2/2025 रोजी सायंकाळी 12.40 मौजे पिंपरे खु।। गावचे हद्दीत निरा डावा कॅनालचे कडेला झाडा झुडुपाच्या आडोशाला हातभटी लावुन त्यावर एक मोठे लोखंडी भांडे ठेवुन खालुन जाळ लावुन शेजारी असणारे एक लोखंडी पातेल्यामध्ये असलेले कच्चे रसायन काठीच्या सहायाने ढवळत असताना दिसला. तेथे आरोपीत परशुराम सुनिल बरकडे हा जाळ घालत व दारूचे कॅन्ड भरत असलेला दिसला. त्यास आमची चाहुल लागताच तो कॅनालचे कडेने झाडी झुडपात पळुन गेला. त्यावेळी परशुराम यास आम्ही थांब थांब असा आवाज देवुनही तो नं थांबता तसाच पुढे पळुन गेला. सदर ठिकाणी एका लोखंडी पातेले त्यामध्ये 10,000 हजार लिटर दारूचे कच्चे रसायन, तसेच 5 प्लास्टीकचे काळें रगाचे कॅन्डमध्ये 35 लीटर प्रत्येकी तयार दारू, एक पांढरे दोन हजार लीटरचे टाकीमध्ये अंदाजे 150 लीटर तयार दारू, अंदाजे 2 टन सरपंण, एक पाण्यातील इलेक्ट्रीक मोटर, एक दगडाची चुल त्यावर एक मोठे पातेले तसेच त्यावर झाकणी, रसायन उपासणेसाठी असताना दिसुन आला. व आम्हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. म्हणुन माझी परशुराम सुनिल बरकडे रा. पिंपरे खु।। ता. पुरंदर जि.पुणे विरूध्द बी.एन.एस.123 सह म.रा.दारूबंदी अधि कलम 65 (फ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं .34/2025 बी.एन.एस.123 सह म.रा.दारूबंदी अधि कलम 65 (फ) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तारडे हे करत आहेत.