क्राईम

Crime News: अवैद्यरित्या गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; 12,64,600/- रु.किंमातीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी गुळंचे हद्दीत घरगुती गॅस सिलिंडर मधून मशिनच्या साहाय्याने गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलिंडर भरणाऱ्या चार जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्याच्या पर्दाफाश झाला आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे कर्नलवाडी गुळंचे हद्दीत सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या पोल्ट्री शेडमध्ये काही व्यक्ती विना परवाना घरगुती गॅसच्या टाक्या मधून कमर्शिअल (व्यापारी) गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. त्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरित्या छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडर चा मोठा साठा जप्त केला.

यामध्ये १,८६,०००/- रू किमतीच्या एचपी कंपनीच्या एकूण भरलेल्या ६२ टाक्या, ३६८००/- रू किमतीच्या एचपी कंपनीच्या भरलेल्या ८ कमर्शियल गॅस टाक्या, ८१०००/- रू किमतीच्या एचपी कंपनीच्या मोकळ्या ५४ टाक्या, ७५०००/- रू किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या मोकळ्या टाक्या, १,३६,८००/- रू किमतीच्या एचपी कंपनीच्या कमर्शियल ५७ मोकळ्या टाक्या, १०८०००/- रु किमतीच्या भारत गॅसच्या ३६ मोकळ्या टाक्या, ३००००/- रु किमतीच्या एस टी पी गॅस भरण्याचे २ मशीन, १००००/- रु किमतीचे तनिष्क कंपनीचे २ वजन काटे, १०००/- रु किमतीचे १०००/- गॅस सील टोपण, ६०००००/- रु किमतीची गाडी क्र.एम एच ४२ बी एफ ५७६१ सुझुकी कंपनीची चार चाकी पिक अप असा एकूण १२,६४,६००/- रु. किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अभिजीत दत्तात्रय बरकडे (२२, मोराळवाडी बारामती), विश्वजीत बारीकराव यमगर (वय २२ वर्षे), पिराळे ता. माळशिरस, तुकाराम चंद्रकांत खताळ (वय ३० वर्षे), कापसी, ता. फलटण, सत्यवान जगन्नाथ निगडे (वय ५० वर्षे), कर्नलवाडी, पुरंदर यांनी पांडुरंग राजेंद्र गोफणे (मोराळवाडी बारामती) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे सांगितले. यातील चार जणांना ताब्यात घेत यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३,७ आणि बी एन एस २८७, २८८,३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ची कामगिरी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक अश्विनी वायसे, अधिकारी महादेव वावरे, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, उपनिरीक्षक झेंडे, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे, पोलीस हवालदार आण्णासाहेब देशमुख, विठ्ठल कदम, संदीप भापकर व दोन शासकीय पंच या पथकाने केली असून सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सर्जेराव पुजारी हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button