आपला जिल्हा

News: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी जानेवारी ते जूनपर्यंतचा शिबीर दौरा जाहीर; जेजुरी व सासवड येथे या तारखांना होणार शिबीर दौरा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जानेवारी ते जून २०२५ मध्ये पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या तारखांना सर्व प्रकारचे वाहन मालक, चालक यांच्या सोईच्या व हिताच्या दृष्टीने वेल्हा, भोर, सासवाड, उरुळीकांचन, पिरंगुट, जेजुरी, हडपसर, शिक्रापूर व शिरुर येथे मोटार वाहन निरीक्षक यांचा शिबीर दौरा आयोजित करण्यात आला आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वेल्हा पंचायत समिती विश्रामगृह येथे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व जूनच्या ३ तारखेला आणि मेच्या ५ तारखेला, उरुळीकांचन येथे ग्रामपंचायत जिजाऊ सभागृह येथे ८, २२ व २७ जानेवारी, ४, १२ व २५ फेब्रुवारी, ४, १२ व २४ मार्च, ४, १५ व २८ एप्रिल, ६, १५ व २७ मे, ४, ११ व २४ जून असा दौरा कार्यक्रम असणार आहे.

हांडेवाडी रोड, श्रीराम चौक, हडपसर येथे १५ जानेवारी, ५ फेब्रुवारी, १० मार्च, ९ एप्रिल, ८ मे व १० जून, कोंढापूरी विश्रामगृह, शिक्रापूर येथे ७ व २१ जानेवारी, ११ व १८ फेब्रुवारी, ११ व २० मार्च, १६ व २४ एप्रिल, १४ व २२ मे आणि १२ व १८ जून, भैरवनाथ मंदिर मैदान, पिरंगुट येथे १३ जानेवारी, २० फेब्रुवारी, १३ मार्च, २३ एप्रिल, २१ मे व १९ जून रोजी दौरा असेल.

शिरुर विश्रामगृह येथे ९, १६ व २३ जानेवारी, ६, १३ व २४ फेब्रुवारी, ६, १८ व २५ मार्च, ८, २२ व २९ एप्रिल, ७, २० व २६ मे, ५, १६ व २५ जून, आयटीआय कॉलेज मैदान, जेजुरी येथे २४ जानेवारी, २१ फेब्रुवारी, २८ मार्च, २५ एप्रिल, २३ मे, व २७ जून, विश्रामगृह, सासवड येथे १० व १७ जानेवारी, ७ व १४ फेब्रुवारी, ७ व २१ मार्च, ११ व १७ एप्रिल, ९ व १६ मे, आणि १३ व २० जून तर जिल्हा परिषद विश्रामगृह, भोर येथे ६ व २० जानेवारी, १० व १७ फेब्रुवारी, ५ व १७ मार्च, ७ व २१ एप्रिल, १३ व १९ मे, आणि ९ व २३ जून २०२५ या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्याच्या दिवशी जर शासनाची सुट्टी जाहीर झाली तर त्या दिवसाचा दौरा आधीचा दिवस किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button