क्राईम

Crime News: दारू पिताना झालेल्या वादातुन मित्राचा खुन करून पुरावा नष्ट करणाऱ्या उद्देशाने मयताचे प्रेत पाण्यात टाकुन पळून जाणाऱ्या आरोपीतास परजिल्हयामधुन अटक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक २७/०९/२०२५ रोजी दुपारी १५/३० वा चे सुमारास मौजे शिरूर ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत पांजरपोळ येथील मोकळया जागेमधील पाण्याने भरलेल्या खड्‌डयात इसम नामे अशोक तात्या खंडागळे (वय ३१ वर्ष), रा बोराडेमळा, शिरूर ता शिरूर जि पुणे याचे मयत प्रेत बॉडी सापडली असल्याने त्याचे नातेवाईक सत्यवान विष्णु पखाले (वय २४ व)र्ष, रा. जोशीवाडी शिरूर, ता. शिरूर जि. पुणे यांनी खबर दिली की, दिनांक २५/०९/२०२५ रोजी दुपारी १५/०० वा चे सुमारास यातील मयत नामे अशोक तात्या खंडागळे हा राहतेघरामधुन निघुन गेला होता व त्यानंतर दिनांक २७/०९/२०२५ रोजी दुपारी १५/३० वा चे सुमारास त्याची मयत प्रेत बॉडी ही मौजे शिरूर ता शिरूर जि पुणे गावचे हद्दीत प्रितमप्रकाश नगर येथील पाण्याने भरलेल्या खड्‌डयात सापडली होती. त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टर नंबर १२९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम १९४ अन्वये मयत दाखल करण्यात आले होते. सदर मयताचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली नाथसाहेब जगताप, पोलीस हवालदार हे करीत होते.

सदर मयताचे पोस्ट मॉर्टम केल्यानंतर मयतास मरण हे पाण्यात बुडुन न झाल्याचे व त्याचे शरीरावर मृत्युपुर्वीच्या जखमा असल्याचे मा वैदयकीय अधीकारी, ग्रामीण रुग्णालय शिरूर यांनी अभिप्राय दिल्याने त्या अनुशंगाने मयताचा तपास सुरू असताना त्यादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे केलेला तपास व तांत्रीक विश्लेषन व सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असता असे निष्पन्न झाले की, मयत नामे अशोक तात्या खंडागळे यास त्याचे मित्र नामे आकाश ज्ञानेश्वर लोहार रा. शिरूर ता शिरूर जि पुणे व त्याचा एक मित्र यांनी दारू पिण्यासाठी श्रद्धा बार, शिरूर येथे बोलावुन घेवुन दारू पित असताना त्यांचेत तेथे त्यांचे वाद झाले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ दमदाटी करून तेथुन एका मोटार सायकल वरून आकाश ज्ञानेश्वर लोहार व त्याचा मित्र यांनी मयत अशोक खंडागळे यास बसवुन नेवुन मौजे शिरूर ता. शिरूर, जि. पुणे गावचे ह‌द्दीमधील प्रितम प्रकाश नगर येथील पांजळपोळच्या मोकळया जागेमध्ये घेवुन गेले. त्यानंतर तेथे आकाश ज्ञानेश्वर लोहार व त्याचा मित्र यांनी दारू पिताना झालेल्या वादाचा राग मनात धरून अशोक तात्या खंडागळे याची गळा दाबुन निघुण हत्या करून पुरावा नष्ट करण्याचे हेतुने सदर मयत प्रेत बॉडी तेथे असणा-या पाण्यात टाकुन पळून गेले असलेबाबत मयताचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे नाथसाहेब भगवान जगताप पोलीस हवालादार यांनी फिर्याद दिली व त्यावरून गु रजि नं ७२५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३, २३८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.

सदर गुन्हयाची गंभिरता व संवेदनशिलता लक्षात घेवुन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, अजय पाटील, यांचे तपास पथके तयार करून आरोपीतांचा शोध घेणेकामी रवाना केली.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा तांत्रीक विश्लेषन व सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून शोध घेत असताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील पाहीजे आरोपीत नामे आकाश ज्ञानेश्वर लोहार हा मौजे कौठाळी ता. पंढरपुर, जि. सोलापुर येथे असल्याची व गुन्हयातील दुसरा संशयीत हा मौजे शिरूर, ता. शिरूर जि. पुणे परीसरात असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ पथकांना रवाना करून स्थनिक पोलीसांचे मदतीने सापळा लावुन शिताफिने आकाश ज्ञानेश्वर लोहार (वय २५ वर्ष) रा. शिरूर प्रितमप्रकाश नगर ता. शिरूर, जि. पुणे यास व त्यांचा एक साथिदार यास ताब्यात घेतले असता तो विधीसंघर्षित असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीताकडे ताब्यात घेवुन चौकशी केली असता दारू पिताना झालेल्या भांडणाचे कारणावरून मयत अशोक तात्या खंडागळे याचा गळा आवळुन निर्घण खुन करून प्रेत पाण्याचे खड्ड्यामध्ये टाकुन पळून गेल्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्हयाचे कामी आरोपी नामे आकाश ज्ञानेश्वर लोहार (वय २५ वर्ष) रा. शिरूर प्रितमप्रकाश नगर ता. शिरूर, जि. पुणे यास अटक करून मा. न्यायालया समक्ष हजर केले असता दिनांक १४/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. तसेच यातील विधीसंघर्षित बालकास मा. पिठासिन अधिकारी बालन्यायमंडळ येरवडा पुणे यांचे समक्ष हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, अजय पाटील, रविंद्र काळे यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button