क्राईम

Crime News: अवैध गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तीन आरोपीतांच्या आवळल्या मुसक्या; दोन गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक १३/०३/२०२६ रोजी रात्रौ ९/०० वाजण्याचे सुमारास पोलीस हवालदार विशाल कोथळकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे निमोणे ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत नागेश्वर विदयालय समोर पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कार नंबर एम एच १२ एच एल ३११४ मध्ये इसम नामे १) समीर प्रकाश शेलार २) संपत गणपत दुर्गे दोन्ही रा. निमोणे हे त्यांचे ताब्यात गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस हे बाळगुन थांबलेले आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी लागलीच सदर माहीती ही पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोवींद खटींग, पोलीस हवालदार विशाल कोथळकर, पोलीरा अंमलदार सुशिल सुरवसे यांनी बातमी मिळाले ठिकाणी सापळा लावुन शिताफिने पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कार नंबर एम एच १२ एच एल ३११४ मध्ये बसलेले इसम नामे १) समीर प्रकाश शेलार (वय २३ वर्ष) २) संपत गणपत दुर्गे (वय ३५ वर्ष) दोन्ही रा. निमोणे ता. शिरूर, जि. पुणे हे यांना ताब्यात घेतले असता फोर्ट फिगो कारमध्ये हॅन्डब्रेक खाली एक गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याचे मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार विशाल कोथळकर यांनी फिर्याद दिलेली असुन त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन गु रजि नंबर २१८/२०२६ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग करीत असुन आरोपीतांना न्यायालया समक्ष हजर केले असता दिनांक १६/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.

दिनांक १४/०३/२०२६ रोजी १५/३० वाजण्याचे सुमारास पोलीस अंमलदार नितेश थोरात, पोलीस अंमलदार राचिन भोई हे शिरूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमदार नितेश थोरात यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इसम नामे नवनाथ गोरटे रा. शिर्डी अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह दुचाकीवरून अहिल्यानगर पुणे हायवे रोडने तोंडाला रूमाल बांधुन शिरूर येथे येत असुन त्याचेजवळ बेकायदेशिर गावठी पिरतुल बाळगुन आहे.

पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लागलीच सदर माहीती ही पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, अजय पानील, दादाराव नागरे यांनी सतरा कमान शिरूर येथे अहिल्यानगर पुणे रोडवर सापळा लावला. त्यावेळी बातमी मिळालेल्या प्रमाणे मोटारसायल आली असता ती भरधाव वेगात पुणे बाजुकडे हायवे रोडने गेली अराता पोलीस पथकाने त्या मोटार सायकलचा पाठलाग करत असताना द नाना स्पॉट डोगंराजवळ मोटार सायकल ही खाजगी वाहनारा धडकुन पडल्याने त्यावरील मागे बसलेला इसम हा नाना स्पॉट डोगंराचे दिशेने पळुन गेला. मोटार सायकल जवळ असलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारात त्याने त्याचे नाव नवनाथ साहेबराव गोर्डे (वय ३८ वर्ष), रा पोहेगाव खुर्द, ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यावेळी सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसे मिळुन आली आहेत. तसेच सदरचा गावठी बनावटीचा पिस्तुल नवनाथ गोर्डे याने मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला सागर बनसोडे रा. राहता अहिल्यानगर याचेकडुन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत शिरूर पोलीरा स्टेशन येथे पोलीस अंमलदार नितेश थोरात यांनी फिर्याद दिलेली असुन त्याबाबत शिरूर पोलीरा स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२१/२०२६ शरत्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत असुन आरोपीतास न्यायालया समक्ष हजर केले असता दिनांक १७/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. शिरूर पोलीस स्टेशनने दोन दिवसांमध्ये केलेल्या कारवाई मध्ये दोन गावठी बनावटीचे अवैध पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार, एक पल्सर मोटार सायकल असा एकुण ३,४५,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे येथील पोलीरा उपनिरीक्षक गोविंद खनींग, शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विशाल कोथळकर, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, सुशिल सुरवसे, अंबादास थोरे, अजय पानील, दादाराव नागरे, संदिप खेडकर, सागर बोराडे, विजय शिंदे, निखिल रावडे, रविंद्र काळे, निरज पिसाळ यांचे पोलीस पथकाने केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button