Crime News: 28 कि.ग्रॅ. वजनाचा सात लाखांचा गांजा जप्त, एक महिलेसह दोन आरोपींना अटक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बाभुळसर खुर्द गावचे हद्तीतील सृष्टी सोसायटी मधील रो हाऊस मध्ये महिला नामे दिव्या गिरे व तिचा नवरा अतुल गिरे यांनी गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आला असल्याबाबतची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दि.26/09/2025 रोजी सकाळी 11.00 वा.चे सु ।। स मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना मिळालेल्या बातमीची माहिती देवुन अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सदर बातमी मिळाल्या ठिकाणी दुपारी 12.30 वा. चे सुमारास दोन पथकासह जावुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये महिला नामे 1) सौ. दिव्या अतुल गिरे (वय 27 वर्षे), सध्या रा. सृष्टी सोसायटी, रो हाऊस कॉलनी, बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि.पुणे. मुळ रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर (2) सुरज दिलीप शिंदे (वय 28 वर्षे), मुळ रा. देवदैठन, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांचे घरझडतीमध्ये किंमत रुपये 7,00,000/- रु. चा एकूण 28 कि.ग्रॅ. वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या, अनाधिकृतपणे विक्रीसाठी जवळ बाळगले स्थितीत मिळुन आले आहेत. सदरचा गांजा महिला नामे दिव्या गिरे याचा पती नामे 3) अतुल वसंत गिरे सध्या रा. सृष्टी सोसायटी, रो हाऊस कॉलनी, बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर याने विक्रीसाठी आणुन दिला असल्याबाबत निष्पन्न झाले आहे.

सदर छापा कारवाई प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) सौ. दिव्या अतुल गिरे (वय 27 वर्षे), (2) सुरज दिलीप शिंदे (वय 28 वर्षे), यांना दि.26/09/2025 रोजी 17.47 वा. अटक करण्यात आलेली असुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. शिरुर यांनी सदर आरोपीतांना दि. 29/09/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला 28 कि. ग्रॅ. वजनाचा गांजा हा फरार आरोपी नामे अतुल वसंत गिरे यास गुन्हयामध्ये अटक केल्यानंतर त्याने सदरचा गांजा हा कोणाकडुन विक्रीसाठी आणला आहे व कोणाला विक्री करणार होता याबाबत पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.
सदरची कामगीरी संदीप गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रा, मा. रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे, प्रशांत ढोले उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो. हवा. विजय सरजिने, पो.हवा. विलास आंबेकर, पो. कॉ. गणेश वाघ, पो, कॉ. उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, म.पो.हवा. विद्या बनकर, पो.हवा. माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, पो.कॉ. रामेश्वर आव्हाड, पो. हवा. हेमंत इनामे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.

रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याकडुन अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरु असुन यामध्ये शाळा, कॉलेज, MIDC मधील कामगर वसाहती मधील कामगारवर्ग, पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक यांच्या सहभागामधुन अंमली पदार्थाचे व्यसनापासुन परावृत्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी मार्गदर्शन करून वेळोवेळी कार्यशाळा घेतलेल्या आहेत.
त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची विक्री करणारे यांचे विरुध्द ठोस पावले उचलुन प्रभावी कारवाईची मोहीम सुरु आहे. अशा प्रकारे अंमली पदार्थ खरेदी-विक्री, सेवनाबाबत माहिती पोलीस स्टेशनला देणे बाबतचे अवहान प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर विभाग यांनी केले आहे.



