क्राईम

Crime News: रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद करून जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून रु. 97,000/- चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शिरुर शहरात रात्रीचे वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रोडने, जाणारे लोकांची जबरदस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढु लागल्या होत्या. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषण करणेत आले. आजूबाजूचे परीसरातील गोपनीय बातमीदार सतर्क केले व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली असता, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे आधारे सदरचे गुन्हे हे शिरूर शहरात राहणारे इसम नामे १) शिरीष सोपान जाधव, (वय १९ वर्षे), रा. होलार आळी, शिरूर, ता. शिरूर जि पुणे २) संतोष मारूती ढोबळे, (वय १९ वर्षे), रा. वाडा कॉलनी, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे यांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून दोघांना शिरूर शहरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी शिरूर शहरात चार गुन्हे केल्याचे सांगितले असून दोन्ही आरोपींचे ताब्यातून एकूण चार मोबाईल ५२,०००/- रु.किं. चे तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल रु. ४५,०००/- किच्या जप्त करणेत आलेल्या आहेत.दोन्ही आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे

१) शिरूर मुक्काम G.R.No. 1318/2023 IPC 392,34

2) शिरूर मुक्काम G.R.No. 1319/2023 IPC 392,34

3) शिरूर मुक्काम G.R.No. 1322/2023 IPC 392,34

4) शिरूर मुक्काम G.R.No. 1336/2023 IPC 392,34

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, शिरूर पो स्टे चे पो.स.ई. एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथासाहेब जगताप, रघुनाथ हाळनोर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button