क्राईम

Crime news: जेजुरीत सोमवती अमावस्या सोहळ्यात 44 तोळे सोने चोरीला

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जेजुरीत सोमवती अमावस्या सोहळ्यात खंडोबा मंदिर ते कहास्नान दरम्यान 44 तोळे सोने चोरीला गेले असून याबाबत 23 जणांनी अज्ञात चोरटे यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार दि. 14/06/2026 रोजी रात्री 10/00 वा ते दि. 15/05/2026 रोजी रात्री 10/00 या चे दरम्यान जेजुरी खंडोबा मंदिर ते कऱ्हा स्नान अंघोळ ठिकाण दरम्यान श्री. खंडोचा सोमवती आमवस्या पालीखीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी खंडोबा देवाची सोमवती आमवस्या पालखी सोहळयाच्या गर्दीचा फायदा घेऊन एकुण 448 रोम (44 तोळे 8 ग्रॅम) किंमत 18,08,000/- रु. चे माझे स्वताचे गळ्यातील सोन्याची चैन व खंडोबा सोमवती आमवस्या देव दर्शना करीता आलेले इतर भाविक लोकांचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयांनी मुददाम लबाडीच्या इरादयाने चोरी करून चोरून नेले आहेत. म्हणुन माझी अज्ञात इसमांचे विरुध्द तक्रार आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पाटील हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button