News: जेजुरी खंडोबा महाद्वार मार्गावरील अतिक्रमण हटविले; पोलिस आणि नगरपालिकेची धडाकेबाज कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय कुलदैवत असलेल्या जेजुरी नगरीतील महाद्वार पथ मार्गावरील वाढत्या अतिक्रमणावर अखेर जेजुरी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत हटविले जेजुरी पोलिस स्टेशनचे अधिकारी दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरपालिका प्रशासन अधिकारी कर्मचारी वर्गाने ही कारवाई केली.

जेजुरी हे महत्वपुर्ण तीर्थक्षेत्र असल्या कारणाने मुख्य महाद्वार शिवाजी चौक ते नदीचौक मार्गावरील भविकांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर वाढली असता वाढत्या अतिक्रमणामुळे भाविकांना रस्त्याने चालताना जिक्रीचे होत चालले होते तर दुकानदार, फेरीवाले यांची अवास्तव होत असलेली वाढ रोकण्यास पालिका प्रशासन दिरंगाई करत होते त्यात भाजीवाले फळं विक्रिते रस्त्यांच्या कडेला पथारे मांडून बसत गेली कित्येक वर्ष या मार्गावरील कारवाई करण्यास विलंब होत होते.
तीर्थक्षेत्र असुनही सुलभ व्यवस्थेचा अभाव त्यातच महामार्ग हॉटेल, भंडार, प्रसाद, खेळणी, पेढेवाल्यांचे ठेले यांनी अक्षरशः संपूर्ण रस्ता व्यापून टाकला होता. अखेर उशिरा जाग आलेल्या पालिका प्रशासनाने दखल घेत पोलिस प्रशासनाच्या फौज फाट्या सह अतिक्रमणावर कायदेशीर हातोडी उचलली आणि आतिक्रमन हटविले. मुख्य चौकात थोडीशी बाचाबाची वगळता काही स्थानिक दुकानदारांनी मंदिराचा अतिरिक्त भाग हटविले.

तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर मंदीर मार्ग कायमस्वरूपी तयार करावा अन्यथा अन्यत्र मार्गाने विकास मार्ग तयार करीत भाविकांना मार्ग उपलब्ध करुण देण्याचा सूर काही स्थानिक नागरिक आणि भाविकांनी आळविला आहे.
जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील तसेच पोलिस कर्मचारी जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त ईंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन निरीक्षक बाळासाहेब खोमणे, राजेंद्र गाढवे, सुनील ताजवे, तेजस बोरकर, अक्षय शिरगिरे, प्रमोद भापकर, नागनाथ बिरांसदार व कर्मचारी वर्गाने अतिक्रमणावर कारवाई केली.