Crime News : जेजुरी येथे आढळला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. 18/04/2025 रोजी दुपारी 02:45 वाजण्याचे पुर्वी जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात रोडचे बाजूला एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 70 ते 75 वर्ष याचा मृतदेह मिळून आला आहे. सदर मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले आहे.

सदर मयताचे डोकिस पांढरे केस दाढी वाढलेलीआहे. कपडे नाहीत, फक्त लाल रंगाची अंडरवेअर आहे. जेजुरी पोलीस येथे खंडु सिताराम जानकर, (वय 65 वर्ष), रा. जेजुरी रेल्वे स्टेशन जवळ पुरंदर, जिल्हा पुणे, यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 41/24 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिंगळे ब.न. 414 हे करीत आहेत. तरी सदर मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.