क्राईम

Crime News: बांधकाम व्यावसायिकाचा निघृण खून करणाऱ्या टोळीवर मोका कायद्या अंर्तगत कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): हवेली पोलीस स्टेशन गु. र. नं. २६०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) १४० (२), २३८, ६१(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) सह आर्म अॅक्ट कलम ४, २७ या गुन्हयातील मयत विठठल सखाराम पोळेकर (वय ७० वर्षे) रा. पोळेकरवाडी, सिंहगडरोड ता. हवेली जि. पुणे यांचा निघृण करणारे व सद्या न्यायालयीन कोठडित असलेले अटक आरोपी टोळीप्रमख १) योगेश उर्फ बाबू किसन भामे, (वय ३२ वर्षे) व त्याचे टोळीतील सदस्य २) रोहित उर्फ बाळा किसन भामे, (वय २२ वर्षे), दोन्ही रा. डोणजे, ता. हवेली, जि. पुणे ३) मिलींद देविदास थोरात, (वय २४ वर्षे), सध्या रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर. ४) शुभम पोपट सोनवणे, (वय २४ वर्षे), सध्या रा. वाघोली, पुणे मुळ रा. खळवाडी, चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर. ५) रामदास दामोदर पोळेकर, (वय ३२ वर्षे), रा. पोळेकरवाडी, डोणजे, ता. हवेली, जि. पुणे यांनी त्यांचे

टोळीचे खडवासला, डोणजे, गोन्हे बु॥ व संपुर्ण सिंहगड रोड परिसरात वर्चस्व वाढविणे करिता व त्यातुन सर्व सदस्यांचा अर्थिक फायदा करून घेणेकरीता त्यांचे टोळीने सातत्याने व संघटीतपणे योजनाबध्द सुरू ठेवलेल्या बेकायदेशिर गुन्हेगारी कृत्यांना वेळीच पायबंद घालणे अत्यंत निकडीचे झाल्याने, अशा समाजविघातक वरील टोळी प्रमुख व त्यातील सर्व सदस्य यांचे विरूध्द कठोर निर्णय घ्यावे लागणार या उददेशाने उपरोक्त नमुद आरोपी याचे विरुध्द सध्या हवेली पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजि नंबर २६०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) १४०(२), २३८, ६१(२), ३५१ (२), ३५१(३), ३(५) सह आर्म अॅक्ट कलम ४, २७ गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (i) (ii), ३(२), ३(४), ४ अन्वये कारवाई करणेची परवानगी मिळणे कामी सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस स्टेशन यांनी पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे व मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांचेकडे प्रस्ताव सदर केला होता.

वरिलप्रमाणे सादर केलेल्या प्रस्तावाचे अवलोकन करून विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर टोळीप्रमुख १) योगेश उर्फ बाबू किसन भामे, (वय ३२ वर्षे) रा. डोणजे ता. हवेली जि. पुणे याचेवर व त्याचे टोळीतील सर्व सदस्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (i) (ii), ३(२), ३(४), ४ प्रमाणे कारवाई करण्याची मंजुरी दिलेली आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढिल तपास सुनिलकुमार पुजारी, उपविभागिय पोलीस अधिकारी, हवेली विभाग, हवेली पुणे ग्रामीण हे पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button