Crime News: पुरंदर: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेले

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुकलवाडीतुन एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवुन नेल्याची फिर्याद तानाजी सुभेदार पवार (वय 45 वर्षे) व्यवसाय – शेळी पालन रा. सुकलवाडी (वाल्हे) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 14/01/2025 रोजी दुपारी 03:30 ते 04:00 वाजताचे सुमारास मौजे सुकलवाडी (वाल्हे) ता. पुरंदर, जि. पुणे येथुन माझी मुलगी (वय 17 वर्षे) रा. सदर हिस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाची तरी फुस लावुन माझ्या कायदेशीर रखवालीतुन बळजबरीने पळवुन नेलेले आहे तरी त्या अज्ञात इसमा विरूध्द तानाजी सुभेदार पवार यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं .17/2025 भा.न्या सं.2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. नांगरे करित आहेत.