क्राईम

Crime News: नवीन तंत्रज्ञानाचा केला वापर, मोबाईल ॲपचे माध्यमातून संपर्कात येणारे इसमांचे अपहरण करून त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम लुटणारे टोळीस केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शिक्रापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९२१/२०२४ भा.न्या.सं. १३७ (२), ३०९ (६) दि.१०/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी हे जय मल्हार खानावळ जवळ रोडलगत उभे असताना चारचाकी वाहनातील इसमांनी मुंबईला जाण्याचा पत्ता विचारण्याचे बहाण्याने फियार्दी जवळ गाडी थांबवून त्यांना जबरदस्तीने चारचाकी मध्ये बसविले. चारचाकी वाहनातील अनोळखी तीन इसमांनी फिर्यादीस मारहाण करून त्याचे कडील मोबाईल काढून घेतला, फिर्यादीस घेवून पुणे-नगर हायवे रोडने नगर बाजूकडे जात असताना चारचाकीतील आरोपी हे कारेगाव येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी उतरले असता, फिर्यादीने संधी फायदा घेवून गाडीतून उतरून पळून गेला आहे. वगेरै प्रकाराबाबत फिर्यादीने शिक्रापूर पोलीस स्टेशन’ येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

गुन्हयाचा प्रकार हा गंभीर असल्याने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून गुन्हयाचा समांतर तपास सुरु करणेत आला. सीसीटीव्ही फुटेज कारचे वर्णन प्राप्त करून घेतले. तसेच चारचाकी कार ही नगर बाजुकडे जात असल्याने नगर जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली गुन्हयामध्ये पांढरे रंगाचे पोलो कारचा वापर करणेत आलेला होता. तपासा दरम्यान सदरची कार ही अहमदनगर जिल्हयातील रेकॉर्डवरील आरोपी सुशांत पोपट नागरे रा. प्रेमभारती नगर, बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर हा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तपास करून वरिष्ठांचे परवानगीने स्था.गु.शा.चे पथकाने अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हयात जावून गुन्हयाचे कामी आरोपी नामे १) सुशांत पोपट नागरे (वय २५ वर्षे) रा. प्रेमभारती नगर, बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर, २) मयुर राजू गायकवाड, (वय २४ वर्षे) रा. गांधीनगर चौभे कॉलनी, बोल्हेगाव अहमदनगर, ३) श्रेयस भाउसाहेब आंग्रे, (वय २४ वर्षे) रा. संभाजीनगर, नागापूर अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेली चारचाकी पोलो कार देखील जप्त करणेत आलेली आहे.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, आरोपी यांनी मोबाईल मधील ग्रींडर डेटींग ॲप चा वापर केला होता, सदर ॲपचे माध्यमातून अनोळखी व्यक्तीला संपर्कात आणले जाते. त्याचेकडून त्याचे लोकेशन घेवून त्या लोकेशनला पोहचून आरोपी समोरील व्यक्तीस सोबत घेतात, त्यानंतर त्या व्यक्तीचे विचीत्र फोटो घेवून त्यास भिती घालून पैसे घेतले जातात. आरोपींनी शिक्रापूर परिसरात अशा प्रकारचे तीन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत एक अशा एकूण चार घटना केलेल्या असून त्यांनी सदर घटनेमध्ये ८० हजार रूपये जबरीने घेतलेले असल्याचे तपासात निष्पन्न झालेले असून सदर घटनांमधील पिडीत व्यक्तींचा शोध चालू असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

यातील आरोपी मयूर गायकवाड याचेवर शरीराविरूद्धचे दोन गुन्हे दाखलू असून आरोपी सुशांत नागरे याचेवर शरीराविरूद्धचा एक गुन्हा दाखल असून दोघेही अहमदनगर जिल्हयाचे रेकार्डवरील आरोपी आहेत.

ग्रीडर डेटींग ॲप अगर इतर मोबाईल ॲप द्वारे संपर्कात येवून कोणत्याही नागरीकांना लुटण्यात आले असल्यास अगर ब्लॅकमेल केले जात असल्यास त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पो स्टे चे दिपरत्न गायकवाड, स्था.गु.शाचे पो.स.ई. अमित सिदपाटील, अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, संजू जाधव, सागर धुमाळ, यांनी केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पो.स.ई. महेश डोंगरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करणेत येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button