आपला जिल्हा

News: माजी विद्यार्थ्यांची 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा; 1999 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे १९९९ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच होळकर तलाव येथील ज्येष्ठ नागरिक संघटना हॉल या ठिकाणी पार पडले. या स्नेहसंमेलनात 42 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. २५ वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला. सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत आहेत.

शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

स्नेहसंमेलनाचे आयोजन रमेश सोनवणे, मंजुश्री बारभाई सह मित्र-मैत्रिणी यांनी केले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अर्चना शिंदे तर समारोप संजय खोरे, अपर्णा भोंगळे, मीरा होले यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button