आपला जिल्हा
News: पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
