Crime News: गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा उद्योजक याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करुन एक बंदुक तिचे 175 जिवंत काडतुस व पिस्टलचे 40 जिवंत काडतुस केले हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): उरुळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. २८२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११५(२) २३८, १२६ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ३० प्रमाणे दि.१४/०९/२०२४ रोजी प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील जखमी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते दोघे रा. भिवरी ता. हवेली जि.पुणे यांचे यांतील आरोपी यांचे बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे यांचेशी आर्थिक व्यवहार होते. सदर व्यवहारामध्ये फिर्यादी यांचे यातील आरोपीकडे चाळीस लाख रु दीड वर्षापुर्वी दिले होते. सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपी यांने फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे म्हणुन त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्यांचे रागातुन आरोपी यांने त्यांचेकडे परवाना असलेले पिस्टल मधुन फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम महादेव गोते यांचेवर जिवेठार मारण्याचे उद्देशाने चार राउड फायरिंग करुन काळुराम गोते यांना हाताला व पायाला राउड लागुन गंभीर जखमी करण्यात आले आहे. वगैरे मजकुराची फिर्याद उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे.

उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने ताबडतोब पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळून गेल्याचे मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला होता, सदर ठिकाणाहुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने १) आरोपी बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे याला ताब्यात घेण्यात येवुन अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे यांने त्याचे कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय ४२ वर्षे) २) जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे (वय१९ वर्षे) ३) आशा सुरेश भोसले (वय ५२ वर्षे) ४) निखील अशोक भोसले (वय २५ वर्षे) सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे योंचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे सर्व आरोपीतांना मा. न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२४ रोजी पर्यत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
जखमी काळूराम गोते याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु असुन त्यांचेवर ०३ काडतुस फायर करण्यात आले आहेत सदर गुन्हयाचे अनुषंगाने एक बंदुक व एकशे पंच्याहत्तर जिवंत काडतुस, पिस्टलचे जिवंत चाळीस काडतुस, तीन दोन बॅरल, ०३ खाली मॅग्झीन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. बापुराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशन चे पोनि नारायण देशमुख, उरुळी कांचन पो स्टे चे पो नि शंकर पाटील स्था.गु.शा.चे सपोनि राहूल गावडे, सपोनि सपांगे, पोसई अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे उरुळी कांचन पो.स्टेचे सपोनि ज्ञानेश्वर बाजीगिरे, सपोनि स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळी कांचन पो स्टे चे अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून पुढील तपास उरुळी पो स्टे चे पो नि शंकर पाटील हे करत आहेत.