क्राईम

Crime News: स्थानबध्द पाहिजे सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके यास सशस्त्र साठयासह पकडुन वालचंदनगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वालचंदनगर पोलीस स्टेशन हददीतील सराईत गुन्हेगार नामे सुयश उर्फ तात्या घोडके याचेवर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने मारहाण, सरकारी नोकर यांना मारहाण करणे, बेकायदेशिरित्या अग्निशस्त्रे बाळगणे व अवैध वाळु चोरीचे असे एकुण ९ गुन्हे दाखल असुन तो पोस्टे हददीत समाजात दहशत माजवुन वर्चस्व निर्माण करण्यासारखी कृत्य करत असल्याने त्याचेविरूदध वालचंदनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी विक्रम साळुखे यांनी त्याचे एम पी डी ए अंतर्गत स्थानबध्द करणेकामी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी पुणे यांना प्रस्ताव पाठविला होता.

सदर प्रस्तावावर मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश कं पगम / एम.पी.डी.ए /एस.आर. /०६/०१/२०२४ दि.३.९.२०२४ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहे. तसेच सदर आरोपी हा वालचंदनगर पोलीस स्टेशन गुरन २४६/२४ कलम ३७९ व सहकलम गौण खनिज अधिनीयम कलम २१ (४) प्रमाणे दाखल गुन्हयात फरार असल्याने आम्ही सदर आरोपीचा शोध घेत असताना पोहवा शैलेश स्वामी, पोहवा गणेश काटकर, यांना सराईत पाहिजे गुन्हेगार सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके हा वालचंदनगर येथील कामगार वसाहत पोस्ट कॉलनी येथील घरात बाहेरून कूलूप लावुन लपुन बसले असल्याची गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनि राजकुमार डुणगे पोलीस स्फाटसह सदर ठिकाणी रवाना होवुन वालचंदनगर येथील कामगार वसाहतीत त्याचे जुने घरी पाठीमागुन प्रवेश करून त्यास ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष घराची झडती घेतली असता खालीलप्रमाणे अवैध शस्त्रसाठा मिळुन आला आहे.

1) 03 गावठी पिस्टल मॅगझीनसह

2) 01 खाली मॅगझीन

3) 10 जिवंत काडतुसे

4) 09 गावठी सुतळी बॉम्ब

5) 01 लोखंडी पालघन मस्ती वाली

6) 01 मुठ नसलेले तलवारीचे धारदार पाते

7) 02 लोखंडी धारदार चाकू

8) 02 लोखंडी धारदार कटर

9) 14 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल

वरील बेकायदशिर शस्त्रसाठा दोन पंचासमक्ष जप्त करून मिळुन आलेल्या गावठी पिस्टल व गावठी सुतळी बॉम्ब बाबत आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके याचेकडे विचारपुस केले असता त्याने त्याचे व त्याचे साथीदाराचे असल्याचे सांगितले आहे. आरोपी सुयश उर्फ तात्या घोडके याचेकडे अवैध शस्त्रसाठा मिळुन आल्याने पोहवा शैलेश स्वामी यांचे फिर्यादी जबाबवरून वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गुरन ३३१/२४ कलम २८८ बीएनएस सहकलम ३,४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम ४ स्फोटक अधिनियम १९०४ सहकलम ३७ (१) (३) / १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीने सदरचे हत्यार कोठुन आणि कोणाकडुन आणली आहे याबाबत सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राजकुमार डुणगे, पो. हवा शैलेश स्वामी, पो हवा. गणेश काटकर, पो हवा प्रमोद बनसोडे, पो. कॉ अभिजीत कळसकर, पो कॉ अमोल चितकोटे, पो कॉ राम आढाव, महिला पो. कॉ. निता किर्दक पो कॉ प्रमोद टापसे, पो कॉ. अमोल सोनवणे, पो कॉ. महेश चोपणे यांनी पार पाडली आहे. सदर कामगिरी बाबत मा. वरिष्ठांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button