Crime News: जेजुरी : बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांकडून सुमारे 1,07,630/- रुपयांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी येथील मल्हार विला इमारतीतील बंद फ्लॅटचा दरवाजाची कडी कोयंडे तोडून सुमारे एक लाख रुपये चा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे .याबाबत संतोष राजकुमार जगताप (वय ३६ वर्षे) यांनी अज्ञात चोरटा याच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष राजकुमार जगताप यांच्या फ्लॅट क्रमांक 103 (डी विंग) येथे दि. 17 जुलै ते दिनांक 25 जुलै या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फ्लॅटचे दरवाजाची कडी कोयंडे तोडून सुमारे 77 हजार रुपये किमतीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेले असून त्याच्या शेजारील शाम संपत साळुंके डि विंग फ्लॅट क्रमांक 202 यांच्या घरातून सुद्धा 30 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 305(A )331 (3)331 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई पाटील व पोलीस हवालदार चितारे तपास करत आहेत.