Crime News:जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; 2,76,250/- रू किमतींचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळअर्जुन गावचे हददीत साळोबाच्या मळ्यात नदी पात्रच्या बाजुला किशोर त्रिंबक टेकवडे यांचे विहीरीचे शेजारी झाडा झुडपाच्या आडोशाला गावठी दारूची हातभट्टी मिळून आली असून याबाबत फिर्यादी नंदकुमार पंढरीनाथ पिंगळे (वय 45 वर्षे) पोलीस हवालदार ब.नं.414 नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन रा.जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी आरोपी नशिब कचु राठोड रा. आनंदनगर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यातमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि.21/07/2024 रोजी 18:15 वा मौजे जवळअर्जुन गावचे हददीत साळोबाच्या मळ्यात नदी पात्रच्या बाजुला किशोर त्रिंबक टेकवडे यांचे विहीरीचे शेजारी झाडा झुडपाच्या आडोशाला नामे नशिब कचु राठोड रा.आनंदनगर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे हा गावठी हातभटटीची दारू तयार करण्याची भट्टी मिळुन आली तेथील साहीत्य पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांनी दोन पंचांचे समक्ष जागीच जप्त करून जप्त 2 लोखंडी पातले व 1 हजार लिटरच्या 1 प्लँस्टीक ड्रम मधील गावठी हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व निळे रंगाच्या प्लॅस्टीक कॅन्ड मधील गावठी हातभटट्ची तयार दारू मधील प्रत्येकी एक 180 मि.लीमापाच्या काचेच्या वेगवेगळया बाटली मध्ये सॅम्पलकरीता काढुन घेवुन जप्तगावठी हातभटटीची तयार दारू व गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण हे जागीच पंचांचे समक्ष जे.सी.बी.ने नष्ट करण्यात आले आहे. म्हणुन माझी इसम नामे नशिब कचु राठोड रा.आनंदनगर जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरूध्द बी.एन.एस 123 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(F) प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई पुजारी हे करत आहेत.