Crime News: अवैध गावठी हातभट्टी दारूवर छापा; 6 लाख 34 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त: उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व जेजुरी पोलीस स्टेशनचे सपोनि वाघचौरे यांची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोथळे गावचे हद्दीत ओढ्याचे कडेला शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला गावठी हातभटटी दारू तयार करण्याची भट्टी मिळून आली असून याबाबत फिर्यादी सोमेश भगवंतराव राऊत (वय 38 वर्षे) पोना 2478/ नेमणुक उपविभागिय पोलीस अधिकारी यांनी आरोपी संतोष राठोड याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 06/6/2024 रोजी रात्री 12/00 वा चे सुमारास उपविभागिय पोलीस अधिकारी भोर तानाजी बरडे यांना गुप्तबातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे कोथळे गावचे हद्दीत कोणीतरी एक इसम ओढ्याचे कडेला शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला गावठी हातभटटी दारू तयार करत आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे हे जेजुरी पोलीस स्टेशन येथे दाखल होवुन सपोनी वाकचौरे व पोलीस स्टाप यांना आम्हा पोलीस अधिकारी व स्टाफ असे प्रभारी यांचे दालनात बोलावुन हातभट्टीवर छापा टाकुन कार्यवाही करणे बाबत माहीती दिली. त्यानंतर खाजगी वाहनाने बातमी ठिकाणी जावुन खाजगी वाहन बातमी ठिकाणी अलीकडे उभे करून पायी लपतछपत जावुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता एक इसम कोथळे येथील ओढ्याचे कडेला शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला भट्टी लावुन त्यावर एक मोठे लोखंडी भांडे ठेवुन खालुन जाळ लावुन शेजारी असणारे दोन लोखंडी पातेल्या मध्ये असलेले कच्चे रसायन काठीच्या साहयाने ढवळत असताना दिसला त्यास आमची चाहुल लागताच तो पळून जावु लागला त्यास मी ओळखुन संतोष थांब असा आवाज दिला त्याने पाठीमाघे वळुन पाहुन तसाच पुढे अंधाराचा व झाडाझुडपाचा फायदा घेवुन तेथुन पळून गेला. आम्ही सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी प्रत्येकी 10 हजार लिटरचे तीन लोखंडी पातीली, त्यामध्ये 30,000 हजार लिटर दारूचे कच्चे रसायन, बाजुला एक टण सरपण, व भटटीच्या बाजुला 35 लिटरची 6 प्लास्टिक कॅन्ड त्यामध्ये एकुन हातभट्टीची 210 लिटर तयार दारु, पालीले झाकण्यासाठी लागनारी थाळी, एक छोटी पाण्यातील मोटर रसायन उपसणे साठी, एक चाटु, असा माल मिळुन आला.

सदर अज्ञात इसम याने सदर गावठी हातभट्टीने मानवी जिवितास हानी होवुन धोका होवु शकतो हे माहीत असताना गुंगीकारक अंमली गावठी हातभटटीची तयार दारू करण्यासाठी लागणारे कच्चे रसायण व गावटी हातभटटीची तयार दारू करीत असताना दिसुन आला व आम्हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. छापा टाकला ती वेळ 00/45 वाजताची होती सदर ठिकाणी मिळुन आलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 6,00,000/- रु कि 3 लोखंडी पातीली त्यामध्ये गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे
30,000 लिटर कच्चे रसायन
2) 1200/- रु कि. पातीले झाकण्यासाठी लागनारी थाळी.
3) 1 टन लाकडी सरपणसाठी रु. 10,000/-
4) 5000 /- रु कि, एक छोटी पाण्यातील मोटर रसायन उपसणे साठी जु.वा.किं.अं.
5) 21,000/- रु.कि.भटटीच्या बाजुला 35 लिटरची 6 प्लास्टिक कॅन्ड त्यामध्ये एकुन हातभट्टीची 210 लिटर तयार दारु
6) 100/- रु किं एक चाटु दारु काढण्यासाठी वापरला जाणारा.
असा एकूण 6,34,300/- रु. किंमतीचा येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माल मिळून आला त्यामधील दोन पचा समक्ष पोसई तारडे यांनी एक 180 मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळ्या बाटली रसायन व एक 180 मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळ्या बाटली तयार दारू, एक चाटु, एक पाण्याची मोटार, असे जागीच जप्त करून सील करण्यात आला जप्त गावठी हातभटटीची तयार दारू व गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण हे जागीच जे.सी.बी च्या साहयाने पंचांचे समक्ष नष्ट करण्यात आले आहे. यावरुन संतोष राठोड पुर्ण नाव माहीत नाही रा. धालेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे विरुध्द भा.द.वि.क 326 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सहा. पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तारडे पो ना /2404 भापकर, सोमेश राऊत यांनी केली आहे.