Crime News: दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण; पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या खामगाव टेक (ता. हेवली जि. पुणे) येथील महालक्ष्मी माता मंदिराजवळुन दि. २०/०५/२०२४ रोजी ६:०० च्या सुमारास कु. पायल सुनिल धुळे (वय 10 वर्षे) या मुलीचे अज्ञात इसमाकडून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी अपहृत मुलगी आणि त्या अज्ञात इसमाचे फोटो प्रसिद्ध करून नागरिकांना आवाहन केले आहे.
मुलीचे अपहरण करणाऱ्या इसमाने निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट व डोक्याला रूमाल बांधलेला असा पेहराव असून त्याच्याकडे मुलीचे अपहरण करताना एक लाल रंगाची मोटार सायकल दिसून येत आहे. याबाबत मुलीचे वडील सुनील बाळु धुळे (वय 29 वर्ष) व्यवसाय मजुरी सध्या रा. खामगाव टेक ता. हवेली जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

अपहृत मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे :
नाव : कु. पायल सुनिल धुळे (वय 10 वर्षे) व्यवसाय शिक्षण, उंची ४ फुट, रंग सावळा, बांधा मध्यम, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे लांबसडक, भाषा मराठी बोलते, नेसणीस अंगात पांढरे रंगाचा फ्रॉक, गालावर खळी पडते, तसेच गालावर उजवे बाजुस काळा डाग, पायात नाही.
संशयीत इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे :
एक अनोळखी इसम, रंग काळा, बांधा मध्यम, अर्धवट टक्कल पडलेले, वय अंदाजे 40 ते 45 वर्षे, अंगात पांढरे रंगाचा शर्ट, काळे रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, त्याच्याकडे टी. व्ही. एस. कंपनीची मोटार सायकल असून त्याच्या पाठीमागील बाजुस 3291 असा नंबर दिसत आहे.
सदर अपहृत मुलीची व संशयीत व्यक्तीची माहीती देणान्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे आवाहन उरुळी कांचन पोलिसांनी केले आहे.
संपर्कासाठी नंबर : 1) शंकर पाटील प्रभारी अधिकारी उरुळी कांचन पोलीस स्टेशन मोनं. ९३७२२३९१३६
2) प्रविण कांबळे पोलीस उपनिरीक्षक उरुळी कांचन पोलीस स्टेशन मोनं. ८३२९६६४६२७
3) उरुळी कांचन पोलीस स्टेशन फोन नंबर ०२०२६९२६२८७