Crime News: जेजुरी : वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेलसर गावचे हद्दीत लक्ष्णीनारायण लॉजींग मध्ये स्वताचे फायद्याकरीता पीडीत महीला हीस प्राप्त करुन तिचकडुन वेश्याव्यवसाय करुन घेवुन त्यातुन मिळालेल्या रकमेतुन स्वताचा आर्थीक फायदा करुन स्वताची उपजीवीका भागवित असताना मिळुन आल्याने फिर्यादी गणेश मारुती नांदे (वय 36 वर्षे) पोलीस नाईक नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी आरोपी 1) अनिल कीसन धांडगे (वय 50 वर्षे) रा. रांजनगाव गणपती गणेश पेट्रोल पंपासमोर ता. शिरुर, जि. पुणे 2) रामा मोगविरा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/03/2024 रोजी 20.20 वा चे सुमारास मौजे बेलसर गावचे हद्दीत लक्ष्णीनारायण लॉजींग मधे लॉज चालक रामा मोगविरा याचे सांगणे वरुन मँनेंजर अनिल कीसन धांडगे (वय 50 वर्षे) रा. रांजनगाव गणपती, गणेश पेट्रोल पंपासमोर ता. शिरुर, जि. पुणे याने स्वताचे फायद्याकरीता पीडीत महीला हीस प्राप्त करुन तिचकडुन वेश्याव्यवसाय करुन घेवुन त्यातुन मिळालेल्या रकमेतुन स्वताचा आर्थिक फायदा करुन स्वताची उपजीवीका भागवित असताना मिळुन आल्याने सदर इसमाविरुदध् अनैतीक मानवी वाहतुन व्यापार प्रतीबंध अधीनीयम 1956 चे कलम 3,4(1), 5 सह भा.द.वि.स कलम,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे करत आहेत.