क्राईम

Crime News: Crime News: जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची मोठी कारवाई; 5,24,200/- किमतींचा मुद्देमाल नष्ट

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ढालेवाडी येथे धरणाच्या कडेला शेतात विहीरीजवळ झाडाच्या झुडपाच्या आडोशाला दारू तयार करण्याची भट्टी मिळुन असून याबाबत फिर्यादी -प्रविण श्रीमंत शेंडे, पोकाँ/ब. नं. 1714, नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनीआरोपी संतोष सुभाष राठोड (वय 45 वर्षे) रा. धालेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.4/03/2024रोजी रात्री 01/00 वा. मौजे धालेवाडी गावचे हद्दीत इसम नामे संतोष सुभाष राठोड (वय 45 वर्षे) रा. धालेवाडी, ता.पुरंदर, जि. पुणे नाझरे धरणाचे परदेशी याचे शेतात विहीरीजवळ झाडाच्या झुडपाच्या आडोशाला दारू तयार करण्याची भट्टी मिळुन आली तेथील साहीत्य महेश पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी दोन पंचांचे समक्ष जागीच जप्त करून जप्त 2 लोखंडी पातले मधील गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व निळे रंगाच्या प्लॅस्टीक कॅन्ड मधील गावठी हातभट्टीची तयार दारू मधील प्रत्येकी एक 180 मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळया बाटली मध्ये सॅम्पल करीता काढुन घेवुन जप्त गावठी हातभट्टीची तयार दारू व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण गहे जागीच पंचांचे समक्ष नष्ट करण्यात आले आहे. यावरून संतोष सुभाष राठोड (वय 45 वर्षे) रा धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे यांचे विरूध्द भा.द.वि.क 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोसई काटे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button