Crime News: जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; 1,59,100/- किमतींचा मुद्देमाल नष्ट

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन च्या हद्दीत हंबीरवाडी (मावडी पिंपरी) हद्दीत तळ्या शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करायची भट्टी मिळुन आली असून याबाबत फिर्यादी तात्यासाहेब विनायक खाडे (वय 40 वर्षे), व्यवसाय- नोकरी पो.हवा/2110 नेमणुक-जेजुरी पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी आरोपी अभिमन्यु उर्फ मन्नु सलीम राठोड रा. मल्हार चौक भोसलेवाडी ता.पुरंदर जि.पुणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1/03/2024 रोजी रात्री 20:45 वा मौजे हंबीरवाडी (मावडी) हद्दीत तळ्या शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला, इसम नामे अभिमन्यु उर्फ मन्नु सलीम राठेड, रा. मल्हार चौक भोसलेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे याची येथील तळ्या शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करायची भट्टी मिळुन आली तेथील साहित्य पोहवा/2097 देशमुख व पोअं/1441 किवळे यांनी दोन पंचांचे समक्ष जागीच जप्त करून जप्त लोखंडी पातले मधील गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व काळे रंगाच्या प्लॅस्टीक कॅन्ड मधील गावठी हातभट्टीची तयार दारू मधील प्रत्येकी एक 180 मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळया बाटली मध्ये सॅम्पल करीता काढुन घेवुन जप्त गावठी हातभट्टीची तयार दारू व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण हे जागीच जे.सी.बी च्या साहयाने पंचांचे समक्ष नष्ट करण्यात आली आहे. यावरून अभिमन्यु उर्फ मन्नु सलीम राठेड रा. मल्हार चौक भोसलेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे यांचे विरूध्द भा.द.वि.क 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तारडे हे करत आहेत.