Crime News: जेजुरी: शेतात अफूची झाडे बेकायदेशीर पणे लागवड करणाऱ्यांवर जेजुरी पोलिसांची कारवाई; 38.28 किलोचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मावडी क.प येथे शेतामध्ये बेकायदेशीरपणे लागवड केलेली अफूची झाडे मिळून आली असून याबाबत फिर्यादी उदय हिरामण पवार (वय 54 वर्षे), व्यवसाय – नोकरी सहाय्यक फौजदार नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन ता. पुरंदर, जि. पुणे यांनी आऱोपी 1) किरण पुंडलीक जगताप (वय 40 वर्षे) रा. मावडी.क.प ता. पुरंदर, जि. पुणे 2) रोहीदास चांगदेव जगताप (वय 55 वर्षे) रा. मावडी क.प ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 29/02/2024 रोजी इसम नामे 1) किरण पुंडलीक जगताप (वय 40 वर्षे) रा. मावडी.क.प ता. पुरंदर, जि. पुणे 2) रोहीदास चांगदेव जगताप (वय 55 वर्षे) रा. मावडी क.प ता. पुरंदर, जि. पुणे या दोघांनी त्यांचे मालकीचे मावडी क.प गावातील जमीन गट नं 189, व 200 मधे शेतामधे अफुच्या झाडांची बेकायदेशीरपणे लागवड केलेली अफुची झाडे एकुण वजन 38.28 किलो बोंडा, पानासहीत, प्रतीकीलो 2000/- रुपये प्रमाणे एकुण किंमत 76.560/- रुपयेची अफुची बेकायदेशीर पणे लागवड केलेली मिळुन आली म्हणुन माझी त्यांचेविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणी मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चेकलम 8 ब, 18 सी. प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे.
सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, यांचे मार्गदर्शनाखाली अण्णा पवार पोलीस निरीक्षक, दीपक वाकचौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक पाटील, तारडे, पोलीस हवालदार तात्यासाहेब खाडे, सोमनाथ चितारे, हिरामण पवार, शुभम भोसले, भानुदास सरक, पोलीस मित्र नानासाहेब घोगरे यांनी केली आहे.