Crime News: जेजुरी : वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन येथे नव्याने पदभार स्वीकारलेले स.पो.निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यवसायाच्या विरोधात धडक मोहीम उभारली आहे. दि.९ फेब्रुवारी रोजी जेजुरी- सासवड रोडवर लक्ष्मीनारायण लॉज ता. पुरंदर, जि. पुणे या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसाय उघड केला आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सासवड- जेजुरी रोड वर असलेल्या लक्ष्मीनारायण लॉज येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तीन पीडित महिला आढळून आल्या. तसेच रोख रक्कम ११५८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रामा मोगरा याच्या सांगण्यावरून मॅनेजर रविष केशव देश भंडारी राहणार ठाणे, सध्या राहणार लक्ष्मीनारायण लॉजिंग अँड बोर्डिंग रेस्टॉरंट ता. पुरंदर, जि. पुणे २) प्रथमेश रामचंद्र जावळे रा. खडकी देवळा, जि. बीड यांनी स्वतःच्या आर्थिक फायदे करता तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ सह भा.द.वि.क ३७०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असून याप्रकरणी संदीप पांडुरंग मोकाशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मदने करत आहेत.