Crime News: जेजुरी परिसरात चोरट्यांचा सुळसूळाट; टेकवडी येथे घराची कडी काढून 2,55,000/- रु. किमतींचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेकवडी येथे अज्ञात चोरट्याने दाराला बाहेरून लावलेली कडी काढून घरातील 2,55,000/- रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली असून याबाबत फिर्यादी फिर्यादी रमेश बाबुराव झिंझुरके (वय 56 वर्षे) व्यवसाय- नोकरी(पी एम पी एल चेकर), मु. रा. टेकवडी, ता. पुरंदर, जि. पुणे, स.रा. कोरेगाव मुळ अलंकार कार्यालया शेजारी ता. हवेली, जि. पुणे यांनी अज्ञात चोरटा यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8/2/2024 रोजी रात्री 12:00 वा चे सुमारास मी आमचे शेतातील कांद्याला पाणी देवुन झोपणे साठी घरी आलो. रात्री 01:00 वाचे सुमारास मी आमचे घरासमोरील ओट्यावर माझा भाऊ बाळासो बाबुराव झिंझुरके हा झोपलेला होता तेथेच ओट्यावर मी त्याचे शेजारी झोपी गेलो. त्यावेळी मी घराला बाहेरुन कडी लावली होती. रात्री 02.45 ते 03.15.वा चे सुमारास मला आमचे राहते घराचा दरवाजा वाजले सारखा आवाज आला तेव्हा मी माझा पुतण्या सुनिल बाळासे झिंझुरके यास अवाज दिला परंतु तो झोपेत असल्याने त्याने मला ओव दिली नाही. त्यानंतर मला घरामधुन वहिणी कमल बाळासो झिंझुरके यांनी अवाज दिला की, काही हवे आहे का असा अवाज येताच कोणीतरी पळुन गेलेचा आवाज आले, नंतर मी उठुन आजुबाजुला पाहिले असता 3 अज्ञात व्यक्ती मला अंधाराचा फायदा घेवुन पळुन जात असताना दिसले. त्यानंतर मी चोर चोर असा आरडा ओरड केली असता आमचे घरातील तसेच शेजारील सर्व लोक जमा झाले असता त्यांना झाला प्रकार सांगीतला आम्ही सर्वानी आजुबाजुला पाहिले असता कोणी ही दिसले नाही थोड्या वेळाने सर्व जण तेथुन निघुन गेले त्यानंतर वहिणी कमल बाळासो झिंझुरके यांनी मला सांगीतले की, आपली देवघरात ठेवलेली लोखंडी पेटी जागेवर दिसत नाही असे सांगीतले नंतर आम्ही घरात सर्वत्र पाहीले परंतु सदर सोन्याचे डाग व पैसे ठेवलेली लोखंडी पेटी कोठे मिळुन आली नाही. तिचा आजु बाजुला शोध घेत असता घरातील कपाटातील कपडे लत्ते अस्ताव्यस्त पडलेली दिसली तेव्हा माझी खात्री झाली की, आमचे घरात कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इरादयाने स्वताच्या फायदयाकरिता माझे घराचे दाराला बाहेरुन लावलेली कडी काढुन घरातील देवघरात ठेवलेली पत्र्याची पेटी घरफोडी चोरी करून चोरून नेली आहे. म्हणुन माझी अज्ञात चोरटया विरूद्ध कायदेशीर फिर्याद आहे. या मजकुरावरुन जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 50/2023 भा.द.वी क -380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पसई एन एल तारडे हे करत आहेत.