Crime News: जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; 2,01,000/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये नव्यानेच रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यवसाय विरोधात धडक मोहीम उभारली आहे. सुमारे दोन लाख रुपयांची हातभट्टीची दारू जप्त करत ती नष्ट करण्यात आली आहे. सदरची फिर्याद पोलीस नाईक गणेश मारुती नांदे यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी अंकुश राठोड (वय २२ वर्ष) याच्या विरोधात भादविक ३२८ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत जेजुरी पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ फेब्रुवारी रोजी जेजुरी गावच्या हद्दीत सिमलेस कंपनीच्या समोर अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जेजुरी पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारली असता, दोन लोखंडी पातेले मध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन अंदाजे किंमत १ लाख ७० हजार, निळ्या रंगाचे प्लास्टिक कॅन, ज्यामध्ये अंदाजे ३० हजार रुपयाची तयार दारू लाकडी सरपण हे जागी पंचांच्या समक्ष नष्ट करण्यात आले आहे .

सदरची कारवाई जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पुजारी यांनी केलीआहे. तसेच दिनांक ७ फेब्रुवारी रोजी जवळाअर्जुन गावच्या हद्दीत सुमारे १२००/- रुपयाची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.