Crime news: जेजुरी : जवळार्जुन येथे बंद घराचे कलुप तोडून 2,47,100/- रु. किंमातीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळाअर्जुन ता. पुरंदर, जि. पुणे येथे बंद घराचे कुलूप तोडून एकूण 2,47,100/- रुपये च्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली असून याबाबत फिर्यादी जालिंदर मुरलीधर टेकवडे (वय 55 वर्ष) रा. जवळार्जुन ता.पुरंदर यांनी अज्ञात चोरटा याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 11/01/2024 रोजी फिर्यादी यांचे राहते घरातून कोणी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.

गेला माल –
1)75,000/- गळ्यातील तीन तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार जु. वा. किं. अं.
2) 75,000/- गळ्यातील तीन तोळे वजनाचा सोन्याचे गंठण जु. वा. किं. अं.
3) 37,500/-17 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जुनी वापरते किंमत अंदाजे
4) 7500/- 03 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील डूल जुने वापरते किंमत अंदाजे
5)25,000/-कानातील एक तोळा वजनाचे सोन्याचे टॉप्स जुने वापरते किंमत अंदाजे
6) 9000/- 30 भार वजनाचे चांदीचा कमरपट्टा जुना वापरता किंमत अंदाजे
7) 4500/- 30 भार वजनाचे चांदीचा पंचारती जुने वापरते किंमत अंदाजे
8) 3600/- 12 भार वजनाचे चांदीच्या पट्ट्या जुन्या वापरता किंमत अंदाजे
9)5000/- रुपये रोख रक्कम
10) 5000/- रुपये रोख रक्कम (रणजीत सोपान टेकवडे )
यांची असे एकूण 2,47,100/- चे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. या मजकुरावरून गु. र.नं. 06/2024 भा.द.वि.कायदा कलम 457, 380, 511 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गावडे हे करीत आहेत.