क्राईम

Crime News: लोकांची फसवणुक करुन पलायण केलेल्या सोनारास परराज्यातुन अटक करुन 55 लाख रुपयांचे 91 तोळे सोन्याचे दागीने पोलीसांनी केले जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कारेगाव येथील “महादेव ज्वेलर्स ” नावाने ज्वेलरीचे दुकान चालविणारा सोनार नामे प्रताप परमार याने परीसरातील बऱ्याचशा नगरीकांकडुन सोने गहाण म्हणुन ठेवण्यासाठी, सोन्याचो दागीने दुरुस्त करण्यासाठी, मोडण्यासाठी व नवीन सोने खरेदीसाठी पैसे घेवुन सोन्याचे दागीने अपहार करुन फसवणुक केले बाबत पोलीस स्टेशनला १५० ते १६० नागरीकांचे तक्रारी अर्ज माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रप्त झाले होते. सदर सोनाराने रातोरात त्याचा कुटुंबासह मोबाईल बंद करुन सोन्यासह पलायन केल्याने नागरीक चिंताग्रस्त झाले होते. बहुतांश तक्रारदार नागरीक हे रांजणगाव MIDC मधील गोर-गरीब कामगार असल्याने त्यांनी आर्थिक अडचणीमुळे त्याच्याकडे सोने गहान ठेवत होते.

सदर प्रकरणाबाबत रांजणगाव पालीस स्टेशनला फिर्यादी नामे मनिषा रामचंद्र नवले, रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर सोनार प्रताप परमार याच्या विरुध्द गुन्हा रजि, ८४४/२०२३ भा. द. वि. क्र. ४०६, ४२० अन्वये दि. ०४.१२.२०२३ राजी गुन्हा दाखल करध्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकास आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर आरोपी त्याच्या कुटुंबासह त्याचे मुळगावी राजस्थानमध्ये देखील राहण्यास नसल्याने व त्याने मोबाईल देखील बंद करुन ठेवल्याने सदर आरेपीचा शोध घेवुन नागरीकांना त्यांचे दागीने परत मिळवुन देण्याचे पोलीसांसमोर मोठे अव्हान निर्माण झाले होते. तपास पथकाने सदर आरोपी बाबात गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक सुहास राकडे, पो. कॉ. उमेश कुतवळ यांनी सदर कटोसन, ता. कडी, जि. अहमदाबाद, राज्य गुजरात येथे जावुन शोध घेतला. सदर ठिकाणी आरोपीचा घेत असताना त्यांना मिळालेल्या एका कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या पॉप्लेटवर आरोपी प्रताप परमार याचे नाव व मोबाईल नंबर मिळून आला. त्याच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी सदर नविन कपडे खरेदीच्या बहाना करुन जावुन माहिती काढली असता सदरचे कपड्याचे दुकान हे आरोपी प्रताप परमार याचेच असल्याची खात्री झाल्यावर कपडे खरेदी झाल्यानंतर दुकानाचे शेठला भेटायचे आहे सांगुन दुकान मालकाला बोलावुन घेत ताब्यात घेतले. सदर दुकान मालक हा आरोपी प्रताप परमार ऊर्फ नरपतसिंह मोहब्बतसिंह रजपुत, (वय- ४० वर्ष), मुळ रा. चामुंडेरी, ता. जि. पाली, राज्य- राजस्थान असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस तपास पथकाने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सदर गन्ह्यामध्ये दि. १२.१२.२०२३ रोजी अटक केली आहे. सदर अटक आरोपीची मा. हु.।। कोर्टाने आरेपीस ०९ दिवसांची पोलीस कोटडी रिमांड दिली आहे. आरोपीकडे पोलीस कस्टेडीमध्ये तपास केला असता आरोपी प्रताप परमार याने फिर्यादीसह इतर १५० ते १६० नागरीकाचे एकुण १०० तोळे सोन्याचे दागीन्यांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रताप परमार याने नागरीकांकडुन घेतलेले सोन्याचे दागीने हे कारेगाव येथील ओंकारबाबा ग्रामिण निधी लि. या पतसंस्थेत व काही दागीने हे त्याच्या ज्वेलर्स दुकानाचा जुना भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हाळ रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे, याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाल्याने आत्तापर्यंत एकुण ५४,६०,०००/- रु किंमतीचा ९१ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने गुन्ह्याचे तपासामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत. सदर आरोपीस दि. २०.१२.२०२३ रोजी पासुन न्यायालयीन कोठडी रिमांड मंजुर करण्यात आलेला आहे.

सदरची कामगीरी अकिंत गोयल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण, मितेश गट्टे अप्पर पोलीस अधिक्षक, पुणे ग्रा., यशवंत गवारी उपविभगीय पोलीस अधिकारी शिरुर विभाग, यांचे मार्गदर्शना खली पोलीस निरीक्षक महेश ढवण, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहा. फौज, दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर, संतोष औटी, माणिक काळकुटे, तेजस रासकर, यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन, हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button