Crime News: पुरंदर: वाल्हा जवळ माळवाडी येथे मोटरसायकल ला पाठी मागून ठोस मारून 1,14,177/- ची जबरी चोरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील वाल्हा गावाचे हद्दीत माळवाडी जवळ मोरया ट्रेडर्स समोरील रस्त्यावर अनोऴखी 4 इसम यांनी पाठीमागुन ठोस मारुन 1,14,177/- ची जबरी चोरी करून पळून गेले याबाबत फिर्यादी अक्षय सुर्यप्रकाश जाधव (वय 29 वर्षे) व्यवसाय – नोकरी, सध्या रा. खांडेकर बंगला जेजुरी बी.एस.एन.एल ऑफिस शेजारी ता.पुरंदर, जि.पुणे. मुळ रा. मु.पो. रहिमतपुर, ता. कोरेगाव जि.सातारा यांनी आरोपी अनोऴखी 4 इसम यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18/12/2023 रोजी रात्री 09/30 वा. वाल्हा ता. पुरंदर, जि. पुणे गावाचे हद्दीत माळवाडी जवळ मोरया ट्रेडर्स समोरील रस्त्यावर माझी जवळील टु व्हीलर होंडा कंपनीची शाईन गाडी घेवुन जेजुरी बाजुकडे येत असताना अचानक माझे गाडीला पाठीमागुन ठोस मारुन गाडी रस्त्यावर पाडुन नुकसान करुन एक टु व्हीलर गाडी पुढे उभी करुन व एक टु व्हीलर गाडी पाठी मागे उभी करुन त्यावरील 4 इसम यांनी मला अडवुन माझे डावे हातावर कशाने तरी मारुन इच्छापुर्वक जबरी दुखापत केली व माझे ताब्यातील बॅग त्यामध्ये सॅमसंग कंपनीचा टॅब अंदाजे 10,000/- रुपये किंमतीचा, बायोमॅट्रीक 1000/- रुपये किंमतीचा अंदाजे ,व त्यात रक्कम 01,03,177/- रुपये ( एक लाख तीन हजार एकषे सत्त्याहत्तर ) अशी एकुण 01,14,177 रुपये ( एक लाख चौदा हजार एकषे सत्त्याहत्तर रुपये ) किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम हिसकावुन घेवुन जबरी चोरी करुन 4 इसम वाल्हा बाजुकडे पळुन निघुन गेले आहेत. म्हणुन माझी सदर 4 इसम यांचे विरुदध कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 759/2023 भा.द.वी.क 394,341,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नवसरे हे करत आहेत.