आरोग्य

आरोग्य: ‘मधुमेह’ नियंत्रित ठेवण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भारतात मधुमेह हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरत चालला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यात सर्व वयोगटाचे रुग्ण आढळून येतात. वाईट जीवनशैली आणि खाण्या पिण्यातली अनियमितता यांमुळे मधूमेह होतो. मधूमेहामुळे मानवी शरीराच्या रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढत जातं. यामुळे मानवी रोगप्रतिकारक क्षमताही कमी होत जाते. कालांतराने माणूस अशक्त होत जातो.

ब्लड शुगर (नियंत्रित) कंट्रोल करण्यासाठी खालील घरघुती उपाय उपयोगी ठरू शकतात :

१) फळांचे सेवनः मधूमेहात शुगर कंट्रोल करण्यासाठी अधिकाधिक फळांचं सेवन करणं महत्वाचं आहे. मात्र मधुमेह असताताना कोणती फळं खावीत आणि कोणती खाऊ नयेत याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. मधूमेहाच्या रुग्णांसाठी अननस आणि कलिंगड हे दोन फळं सोडून सर्व फळं खाणं उपयुक्त आहे असं जाणकार सांगतात. अननस आणि कलिंगड सोडल्यास बाकी सर्व फळांमद्धे ग्लुकोजचं प्रमाण ५५ पेक्षा कमी असतं त्यामुळे बाकी सर्व फळं खाण्यास उपयुक्त आहेत असं देखील जाणकारांचं म्हणणं आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी सफरचंद, द्राक्ष आणि ब्लुबेरी यांच्यासारखी फळं खाणं फायद्याचं आहे.

२) लसूण खाल्यामुळेही होते शुगर कमी दररोज दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीरात इंसुलिन सेंसिटीव्हिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत होते. रोज २ लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यामुळे एका आठवड्याच्या आतमध्ये ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते.

३) तूळशीचे पानं खाल्ल्यामुळे येते शुगर कंट्रोलमध्ये तुळशीचे पानं आपल्याला सहज उपलब्ध होते. याच तुळशीच्या पानांमुळे आपलं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. तुळशीच्या पानात असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे ब्लड शुगर कंट्रोल राहण्यास मदत होते. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये असे काही तत्व असतात जे, बीटा सेल्सला इंसुलिनच्या प्रती सक्रिय बनवतात. रोज तुळशीच्या पानाचा रस घेणं किंवा तुळशीचे पानं चावून खाणं उपयुक्त ठरते.

४) दालचिनी खाणे कलमीच्या नियमित सेवनामुळे म्हणजेच दालचिनी खाण्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. दररोज दालचिनीची पावडर गरम पाण्याबरोबर – घेतल्यामुळे शुगर एक आठवड्याच्या आत कंट्रोलमध्ये येते.

याचप्रकारे दररोज चालणे, एकाचवेळी जास्त जेवण न करता दिवसात २ तासांनी थोडं थोडं जेवणे, आपल्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा आणि मेथीच्या भाजीचा समावेश ठेवण हे देखील उपयुक्त ठरते.

टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button