आरोग्य: तुम्हाला माहिती आहेत का? ‘तुरटीचे’ हे आरोग्यदायी फायदे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): तुरटी म्हणजेच फिटकरी हिचा वापर आपण कुठे थोडेफार त्वचा सोलली गेली असेल तर ती बरी होण्यासाठी करतो. पण या व्यतिरिक्त सुध्दा अनेक फायदे तुरटी आपल्याला देते जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील. चला तर पाहूया तुरटी (फिटकरी) फायदे. पावसाळ्याच्या मौसमात तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. तुरटी ही दोन रंगात मिळते लाल आणि सफेद. जास्त प्रमाणात लोक सफेद तुरतीचा वापर करतात.
तुरटीचे आरोग्यदायी फायदे:
1) ज्या लोकांना जास्त घाम येण्याची समस्या आहे त्या लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी तुरटी मिक्स करून अंघोळ केल्यास घाम येणे कमी होते.
2) कापले असेल किंवा एखादी जखम झाली असेल आणि त्यामधून रक्त येत असेल तर जी जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी आणि जखमेवर थोडीशी तुरटीची पावडर टाकावी यामुळे रक्त वाहने (येणे) बंद होईल.
3) टान्सीलची समस्या असेल तर गरम पाण्यात चिमुटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळणी करा. यामुळे टान्सीलच्या समस्ये मध्ये आराम मिळतो.

4) अर्धा ग्राम फिटकरी पावडर मधा मध्ये मिक्स करून चाटल्यामुळे दमा आणि खोकल्या मध्ये आराम मिळतो.
5) दररोज दोन्ही वेळा तुरटी गरम पाण्यात एकत्र करून गुळणी केल्याने दाताचे किडे तसेच तोंडाचा वास दूर होतो.
6) तुरटी आणि काळी मिरी पावडर करून दातांच्या मुळाना घासल्यास दातदुखी कमी होते. सेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावल्यामुळे चेहरा मुलायम होतो.
7) एक लिटर पाण्यात १० ग्रॅम तुरटी मिसळून त्याने केस दररोज धुतल्यास केसातील उवा मरतात. दहा ग्राम तुरटीच्या चूर्ण मध्ये पाच ग्राम सेंधव मीठ टाकून पावडर बनवा. या पावडरीने दररोज दात घासल्यास दातांच्या दुखण्यात आराम मिळतो.
टीप: कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.