आपला जिल्हाकृषी

News: कृषी विभागाच्या भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण पथकाची कारवाई; 34 वितरकांचे परवाने निलंबित

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): खरीप हंगाम २०२६ मध्ये निविष्ठांची गुणवत्ता राखण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले असून पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या तपासणीत ३४ वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळयुक्त खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या विक्रीस आळा बसण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकांनी जिल्ह्यामध्ये वितरकांच्या तपासण्या केल्या, तपासणी दरम्यान गंभीर अनियमियता आढळलेल्या वितरकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कृषी सेवा केंद्र तपासणी वेळी विक्री परवान्यामध्ये साठा रजिस्टर मधील शिल्लक खत साठा व प्रत्यक्षात असलेला खत साठा ताळमेळ न जुळणे, विक्रीस ठेवण्यात आलेल्या कंपनीच्या उत्पादनाच्या स्रोतांचा परवान्यामध्ये समावेश नसणे, ज्यादा दराने विक्री करणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, शेतक-यांना पक्की बिले न देणे आदी कारणामुळे ३४ वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून यामध्ये खतांचे २६, किटकनाशके २ व बियाणांचे ६ परवान्यांचा समावेश आहे. तसेच आंबेगाव तालुक्यात ८, भोर-२, दोंड-९, इंदापुर-२, जुन्नर-९ आणि शिरुर–४ याप्रमाणे परवाने निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. काचोळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button