क्राईम

Crime News: सराफ व्यावसायिकास लुटणारी सराईत टोळी जेरबंद करत दरोडयाच्या गुन्हयाची केली उकल: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील शिवापूर वाडा गावचे हद्दीतील आकांक्षा ज्वेलर्स चे मालक यशवंत राजाराम महामुनी रा. शिवापूर ता. हवेली जि. पुणे हे दि. ०५/११/२०२३ रोजी रात्री ०९/०० वा सु । स दुकानातील सोने चांदीचे दागिने घेवून घरी जात असताना कोंढणपूर रोडवर दोन पल्सर मोटार सायकलवरील अनोळखी इसमांनी त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांचे ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने एकूण ६,५८,०००/- रू किं.चे चोरून नेले होते. त्याबाबत त्यांनी राजगड पो. स्टे. येथे फिर्याद नोंदविली आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे वतीने सुरु केला असता, अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषण करणेत आले. सलग दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्हा करून आरोपी हे त्यांचेकडील दोन पल्सर मोटार सायकलवरून शिवापूर-राठवडे-आंबवणे मार्ग कापूरहोळ बाजूकडे गेल्याचे आढळून आले. परंतु अनोळखी आरोपींची ओळख पटलेली नसल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाचे अनुषंगाने आजूबाजूचे परीसरातील गोपनीय बातमीदार सतर्क केले तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली असता, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे आधारे सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार नामे १) निलेश पांडुरंग डिंबळे रा कल्याण ता. हवेली, जि. पुणे याने त्याचे साथीदार नामे २) रोहित साठे रा. सहाकारनगर आण्णभाऊ साठे वसाहत नं. २ पुणे, ३) निखिल कांबळे रा. लेन नं.०६, बिबवे नगर, अप्पर पुणे ४) साहील पटेल रा. आंबेडकर वसाहत लक्ष्मीनगर पुणे ५) निलेश दशरथ झांजे, रा. वडगाव झांजे ता. हवेली जि पुणे, व इतरांचे मदतीने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून आरोपी नामे १) रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय २५ वर्षे), रा. सहकारनगर, आण्णा भाऊ साठे वसाहत नं. ०२ पुणे २) निखिल भगवंत कांबळे, (वय २८ वर्षे), रा. आई माता मंदिर, लेन नं. ०६, बिबवेनगर, अप्पर पुणे ३) निलेश दशरथ झांजे, (वय २५ वर्षे), रा. वडगाव झांजे, भैरवनाथ मंदिराजवळ, ता. वेल्हे जिल्हा, पुणे ४) शफीक मकसूद हवारी (वय १९ वर्षे). निलकमल सोसायटी इंदिरानगर कुंभारवाडा, यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून गुन्हयातील चोरी गेलेले साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे व तीन किलोग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपये किंचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करणेत आलेली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पो स्टेचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, स्था.गु.शा. कडील सपोनि नेताजी गंधारे, पो.स.ई. प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजित भुजबळ, राहुल घुबे, दत्ता तांबे, निलेश शिंदे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, धिरज जाधव, अक्षय सुपे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पो नि आण्णासाहेब घोलप, सपोनि नितीन खामगळ, पोलीस अंमलदार राहुल कोल्हे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button