आपला जिल्हा

News: अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन येत्या १५ दिवसात सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी ३५९ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही; तसेच वाहन सोडवून घेण्याबाबत हक्कही सांगितलेला नाही. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून अशा वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल.

वाहने सोडवून घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यापैकी रस्त्यावर वापरण्यायोग्य वाहनांचा लिलाव https://eauction.gov.in या संकेतस्थळावर आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या व वापरण्यायोग्य नसलेल्या वाहनांचा लिलाव https://www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळांना तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे- १ येथे साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button