आपला जिल्हानिवडणूक

News: जेजुरी पोलीस स्टेशनकडून भारतीय नागरी संहीता 2023 कलम 168 अन्वेय नोटीस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): सर्व ग्रुप ॲडमिन आणि सदस्य (सर्व समाज माध्यम/सोशल मीडिया) ता. पुरंदर, जिल्हा पुणे ज्या अर्थी आपण आपले गावात/शहरात सोशल मिडीया माध्यमातुन एकमेकांशी संवाद साधत आहात व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दि. १५/१०/२०२४ रोजी पासुन आदर्श आचार संहीता लागु असुन निवडणुक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. दरम्यान अपर जिल्हादंडाधिकारी पुणे श्रीमती ज्योती कदम, यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये निर्बंध लागु केले आहेत.

त्या अर्थी मी दिपक वाकचौरे, प्रभारी अधिकारी जेजुरी पोलीस स्टेशन मला प्राप्त अधिकारान्वये आपणांस नोटीस देतो की, मतदान प्रक्रिया प्रचारामध्ये आपणांस कोणतेही गैरकृत्य करण्यापासुन परावृत्त होणे करीता खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करीत असुन विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने लागु असलेल्या आचार संहीतेच्या काळात खालील प्रमाणे नियंमांचा भंग करणे हा आदर्श आचार संहीतेचा भंग मानला जातो.

१) कोणत्याही उमेदवाराशी संबंधीत त्याचे वैदयकीय/कौंटुबीक अगर सामाजीक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिका टिपण्णी करणे, मजकुर, फोटो, व्हीडीओ (एडिट/मार्फिग) करून प्रसारीत करणे अथवा आलेल्या संदेशावरून शहनिशा न करीता आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे वा पुढे पाठवणे.

२) मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्यही धर्माच्या लोकाच्या धार्मीक, भाषीक तसेच जातीय दृवेश पसरविणारे अक्षेपार्ह मजकुर फोटो, व्हीडीओ कोणतीही शहनीशा न करता (एडिट/मार्फिग) करून प्रसारीत करणे.

३) निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया गृप निर्माण करून त्याद्वारे अक्षेपार्य मजकुर, फोटो, व्हीडीओ (एडिट/मार्फिग) करून प्रसारीत करणे अथवा कृत्य करणे.

४) कुठल्याही व्हाट्सअप ग्रुपमध्ये आचार संहीता भंग होईल अथवा दोन गटामध्ये वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकुर, फोटो, व्हीडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबधीत व्यक्तीसह ग्रुप ॲडमीन जबाबदार असणार आहे. त्याकरीता ॲपची सेटींग चेंज करून ओन्ली फॉर ॲडमीन वर करून घ्यावी.

वरील सुचनांचे पालन करणे हे आपल्याला बंधनकारक राहील आपलेकडुन आदर्श आचारसंहीता भंग झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल व आपले विरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपणाविरूध्द पुरावा म्हणुन मा. कोर्टासमोर सादर करण्यात येईल यांची नोंद घ्यावी

सदर नोटीस ही आज दि. ११/११/२०२४ रोजी माझे सही शिक्याने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button