जेजुरी: विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती यांचे न्यायालयात तीन जाब देणार आरोपी यांना उचित जामीना अभावी कारावास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 06/11/24 रोजी, जाब देणार केतन उर्फ मोत्या बाळासाहेब सस्ते (वय 25 वर्षे) रा. मावडी सुपे, विवेक ऊर्फ गोट्या तानाजी बहिरट (वय 26 वर्षे) रा. मावडी सुपे, जीवन उर्फ पिंट्या अशोक देवकर (वय 27 वर्षे) रा . मावडी सुपे तालुका पुरंदर जिल्हा पुणे पोलीस ठाणे जेजुरी यांचे विरूद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 129 प्रमाणे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे जेजुरी पोलीस ठाणे यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्याकडे नमूद विरोधक यांच्या गैरकृत्याना आळा बसावा म्हणून व सामाजिक शांतता भंग होण्याचे दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई चा प्रस्ताव प्राप्त झालेला होता.

सदर विरोधक विरूद्ध यवत पोलीस ठाणे पुणे ग्रामीण सन 2017 मध्ये 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर आरोपी जामिनावर असून त्यांच्या विरूद्ध तक्रारी प्राप्त होत्या.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश बिरादार यांनी उपरोक्त नमूद जाब देणार विरूद्ध आज सुनावणी घेवून, सशर्थ जामीनदार सादर करेपर्यंत साध्या कारावासा करिता मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे रवाना केले आहे.
