News: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी सुधारित शिबीर दौऱ्याचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नोव्हेंबर महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाकरिता सार्वजनिक सुट्टी असल्याने सुधारित शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ५ व ६ नोव्हेंबर, मंचर येथे १२ व १३ नोव्हेंबर, जुन्नर येथे २१ व २२ नोव्हेंबर, वडगाव मावळ येथे २५ व २७ नोव्हेंबर तर लोणावळा येथे २८ व २९ नोव्हेंबर या दिवशी पक्की सुधारित अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
